Parola

पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा

पारोळा प्रतिनिधी कमलेश चौधरी

पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा

अमळनेर येथील पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे पारोळा येथील राणीलक्ष्मी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंग पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहजीवन संस्थेचे सदस्य रोहनदादा मोरे व उपप्राचार्य डॉ डी आर पाटील व प्राध्यापक एस बी भावसार होते .कार्यशाळेत यावर्षी पीएसआय पदी निवड झालेले साक्री येथील विशाल देवरे,मालेगाव येथील पीएसआय शेखर बागुल,अमळनेर येथील पीएसआय संदीप भोई या तिघांनी मार्गदर्शन केले.पीएसआय शेखर बागुल यांनी सोशल मिडिया आणि आजचा समाज आणि सोशल मीडियाचा अभ्यासात वापर याविषयावर सखोल विचार मांडले तरुणांनी सोशल मीडियाचा वापर आपल्या जीवनात किती आणि कसा करावा तसेच त्याचे फायदे तोटे त्यानी समजावून सांगितला .मिशन 2020 याविषयावर बोलतांना पीएसआय शेखर बागुल यांनी स्वतःचा अतिशय मनोरंजक जीवन प्रवास उलगडताना मी पाचव्या प्रयत्नात बारावी पास होवून सुद्धा पीएसआय झालो मित्रांच्या मदतीने अभ्यास सुरु केला चांगले मित्र लाभले अभ्यासाचे नियोजन केले आणि यश मिळवले तसेच त्यांनी पुढील वर्षी होऊ घातलेल्या परीक्षांची तयारीवर प्रकाश टाकला .पीएसआय संदीप भोई अमळनेर यांनी मी पहिल्याच प्रयत्नात पीएसआय झालो याविषयावर मार्गदर्शन करताना सामान्य परिस्थितीतुन मार्ग काढत अभ्यासाचे उत्कृष्ट नियोजन करून कोणताही क्लास न लावता पहिल्या प्रयत्नात पीएसआय झालो असे सांगून विद्यार्थ्यांना त्यांनी अभ्यासाच्या टिप्स दिल्या ,तसेच कार्यशाळेत 2020 मध्ये होऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, अभ्यासाचे नियोजन कसे करावे कोणत्या परीक्षेसाठी कोणती पुस्तके वाचावेत याबद्दल मार्गदर्शन केले कार्यशाळेचा तीनशे विद्यार्थ्यांना लाभ झाला
आमच्या महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे पीएसआय शेखर बागुल ,विशाल देवरे,संदीप भोई यांनी अप्रतिम असे मार्गदर्शन केले आहे खूपच प्रेरणादायी विचार आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत मिळाल्या बद्दल संस्थेचे सदस्य रोहन वसंतराव मोरे यांनी पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला धन्यवाद दिले यावेळी प्रा. डॉ. पी. एम. येवले , प्रा. पी. बी. पाटील, प्रा. एस. व्हीं. चव्हाण, प्रा पी एच भावसार , प्रा.. डॉ. आर. बी. नेरकर , प्रा एम आर करंजे प्रा एस बी सावंत प्रा एस एन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते समन्वयक प्रा डॉ जी पी बोरसे यांनी प्रास्ताविक केले व कार्यशाळेचे उत्कृष्ट नियोजन केले कु.निकिता पाटील व कु.मीनल पाटील हिने सूत्र संचलन केले व कार्यक्रमाची सांगता ह. भ. प. युवावक्ते चंद्रकांत पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मा. प्राचार्य बी. व्ही. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी तृतीय वर्ष विज्ञान रसायनशास्त्र विभागाचे विद्यार्थि व विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button