Amalner

अमळनेर :डायटचे अधिव्याख्याते यांची शाळा सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी शाळा पाहणी भेट —!

डायटचे अधिव्याख्याते यांची शाळा सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी शाळा पाहणी भेट —! !
अमळनेर येथील स्व. पं. श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेस शहरी विभागातील इयत्ता 1 ली ते 7 वी च्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनाने अधिकृतरित्या शाळा सुरू करण्यासाठी आदेश निर्गमित केल्यानुसार आज वरीलप्रमाणे शालेय विद्यार्थी आवश्यक अशा सर्व तयारिपूर्ण सुविधेनुसार शाळेत उपस्थित झाले होते . त्याअनुषंगाने जळगांव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( डायट ) येथील जेष्ठ अधिव्याख्याते आप्पासाहेब प्रा. डॉ. डी. बी. साळुंखे आणि सहाय्यक अधिव्याख्याते प्रा . शैलेश पाटील यांनी शाळा भेट व शालेय अंमलबजावणी निमित्ताने भेट दिली .
सदर भेटीप्रसंगी डॉ. डी. बी. साळुंखे यांचे शाळेच्या वतीने उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . तसेच प्रा .शैलेश पाटील यांचे जेष्ठ शिक्षक व्ही. डी. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
तद्नंतर प्रा . डॉ. डी. बी. पाटील यांनी सर्व उपस्थित शिक्षक – शिक्षिका कर्मचारी यांना शालेय विद्यार्थी उपस्थिती आणि कोरोना काळातील परिस्थिती विषयावर मार्गदर्शन करतांना सूचित केले की, आपण आपल्या वर्गातील विध्यार्थी हेच आपले दैवत असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तापूर्ण वाढीसाठी व प्रगतीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत राहावे हीच खरी आपल्या जीवनाची खरी कमाई आहे. त्यासाठी आपण कोरोना काळातील झालेली शैक्षणिक उणीव अधिकाधिक भरून काढण्यासाठी सदोदितपणे कार्यरत व अपडेट राहावे . तसेच प्रा. शैलेश पाटील यांनीही विध्यार्थी गुणवत्ता स्तर आणि विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण यांची सांगड घालून आधुनिक तंत्रज्ञानाची कशा पद्धतीने तयारी करून घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. आणि काही अडचणी निर्माण आल्यास आमच्याशी संपर्क साधून त्यावर मार्ग काढता येईल . आणि विध्यार्थी प्रगती साधता येईल असे विचार कथन केले .
सदर मार्गदर्शनानंतर संस्थाध्यक्ष माननीय प्रकाशभाऊ मुंदडा यांच्याशी भ्रमणध्वनिवरून प्रा . डॉ. डी. बी. साळुंखे यांचा संपर्क करून दिला असता शालेय व्यवस्थापन आणि नियोजन याविषयी समाधान व्यक्त केले आणि शालेय गुणवत्ता अधिकाधिक कशी वाढेल आणि टिकून राहील याविषयी चर्चा करण्यात आली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि सर्व उपस्थितांचा परिचय आणि अधिकची ओळख पी. बी. चौधरी उपक्रमशील शिक्षक स्व. सौ. पी. एन. मुंदडा माध्यमिक विद्यालय, अमळनेर यांनी करून दिला .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button