Chandwad

चांदवडला प्रभारी पोलीस अधिकारी राजपूत रुजू

चांदवडला प्रभारी पोलीस अधिकारी राजपूत रुजू

उदय वायकोळे

चांदवड
चांदवड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांची बदली झाल्याने देवळा येथून बदलून आलेले श्री स्वप्नील राजपूत सहायक पोलिस निरीक्षक यांचेकडे प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.श्री राजपूत यांनी याअगोदर धुळे मोहाडी ,सांगली,देवळा या ठिकाणी सेवा बजावलेली आहे.

चांदवड शहर हे मुंबई आग्रा महामार्गावरील गाव असल्याने मागील काही दिवसांपासून विविध प्रश्नांनी चर्चेत आहे. चांदवड येथील पोलीस ठाण्याला अनेक दिवसांनी तरुण तडफदार पोलीस अधिकारी मिळाल्याने नागरीकांच्या आशा उंचावल्या आहेत.
श्री राजपूत रुजू नगरसेवक अल्ताफ तांबोळी,जाहिद घासी यांचेसह अनेकांनी साहेबांचे बुके,शाल देऊन स्वागत केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button