India

आरोग्याचा मुलमंत्र..दिवाळी च्या उटण्याचे फायदे

आरोग्याचा मुलमंत्र..दिवाळी च्या उटण्याचे फायदे

उटणे म्हणजे काय.?
उटणे हा अगरू (ऊद), चंदन, कस्तुरी, केशर इत्यादी सुगंधी पदार्थापासून केलेले एक मिश्रण आहे. हा अंगास लावून मर्दन केल्याने शरीर/चेहरा स्वच्छ होतो. कांती उजळते. अंगास सुगंध येतो.

पुरातन काळापासून उटणे हे अत्यंत उत्तम सौंदर्य प्रसाधन ओळखले जाते. मुळात हे आयुर्वेदिक असून यामध्ये उपयोग करण्यात आलेले साहित्य हे केमिकलमुक्त आणि त्वचेला फायदेशीर ठरते. शरीराच्या स्वास्थतेसाठी उटणे अत्यंत चांगले मानण्यात येते. उटण्याचा उपयोग राजा – महाराजांपासून अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पूर्वीपासून करण्यात येत आहे. वनस्पती आणि सुगंधी तेलांचा मिलाफ करून उटणे तयार करण्यात येते. याचे एकत्रित गुण त्वचा अधिक चमकविण्यासाठी आणि ताजीतवानी राहण्यासाठी मदत करतात.
खरं तर उटणे म्हणजे एक प्रकारचे हर्बल मास्क आहे ज्याचा उपयोग अगदी पुरातन काळापासून करण्यात येतो.

•उटणे लावण्याचे फायदे

१. स्वच्छ त्वचा :

उटण्यामधील आयुर्वेदीक घटकांमुळे संसर्ग कमी होण्यास मदत होते. परिणामी अ‍ॅक्ने, पिगमेंटेशन, स्कार्स कमी होण्यास मदत होते. यामुळे सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. लिंबामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने त्याचे काही थेंब मिसळणे फायदेशीर ठरते. आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर केल्याने त्वचा निरोगी होण्यास मदत होते. मात्र त्यानंतर लगेचच सूर्यप्रकाशात जाणे टाळा. जायचे झाल्यास सनस्क्रीनचा वापर आवर्जून करावा.

२. चमकदार चेहरा :
उटण हे एका स्क्रबरप्रमाणे काम करत असल्याने टॅनमुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत करते. तर बेसन त्वचेवर साचलेला डेड स्किनचा स्तर कमी करण्यास मदत करते. परिणामी त्वचेचा पोत सुधारतो. चंदनामुळे त्वचेत थंडावा राहण्यास मदत होते. तर यामध्ये दूध मिसळल्यास त्वचेला कांती मिळते.

३. चेहर्‍यावरील केसांची वाढ रोखते :
चेहर्‍यावरील केसांची वाढ कमी करण्यासाठी अनेक भारतीय स्त्रिया उटण्याची निवड करतात. उटण्याची पेस्ट चेहर्‍यावर गोलाकार दिशेने फिरवल्यास मुळापासून त्याची वाढ रोखण्यास मदत होते. महिनाभर हा प्रयोग केल्यास त्याचे निकाल अधिक स्पष्टपणे दिसून येतात. पण उटण्याने मसाज करताना त्वचेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. त्वचेचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी भिजवलेली मसूर डाळ, सुकवलेल्या संत्र्याच्या सालीची पेस्ट आणि उटणं याचे एकत्र मिश्रण बनवून त्याचा हलका मसाज चेहर्‍यावर करावा.

४. त्वचेचे एजिंग कमी होते :
त्वचेवर सुरकुत्या पाहणे कोणाला आवडते ? पण वयानुसार त्यांचे येणे सहाजिकच आहे. उटणं लावल्याने ही समस्या कमी करण्यास मदत होते. हळदीमध्ये अ‍ॅन्टी एजिंग, अ‍ॅन्टी ऑक्सिडेटीव्ह आणि दाहशामक क्षमता असते. यामुळे सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. यामध्ये मध मिसळल्यास त्वचा मुलायम राहते. यामुळे त्वचेचे नुकसान भरून निघण्यासोबतच ते टाळणेदेखील शक्य होते.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथी तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button