? आमच्या तांबेपुरा परिसराचा वाली कोण ?तांबेपुरा परिसराकडे प्रशासनाची डोळेझाक….रहिवाशींची आर्त हाक….संदीप सैंदाणेअमळनेर
६०००ते ७००० लोकवस्तिची घनता असणारा तांबेपुरा परिसरातिल हजारो नागरीक मुलभुत सुविधांपासुन वंचित असुन कोणिही लोकप्रतिनिधी आमच्याकडे ढुंकायला देखिल तयार नाहीत अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक १ अर्थात तांबेपुरा, गणेश कॉलनी,भवानी नगर,IUDP कॉलनी,विप्रो कॉलनी,वैभव कॉलनी, समता नगर,इत्यादी परिसर मिळुन तयार झालेले वार्ड नं.१ अनेक समस्यानी ग्रस्त आहे. नगर पालिका प्रशासनाने लक्ष देन्याची मागणी रहिवाश्याची आहे. कोव्हीड १९ च्या पार्श्वभुमिवर आरोग्य यंञनेने गाफिल न राहता परिसर निर्जंतुकिकरन, गटारी सफाई,पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेजेस काढणे,पाण्यची टाकी स्वच्छ करणे,गरिबांना सर्वतोपरी मदत करणे ,कायमस्वरूपी दोन पोलिसांची नेमणुक करणे,वरिष्ठ नागरिकांसाठी प्रार्थमिक आरोग्य तपासणी केद्र सुरू करणे ईत्यादी समस्यांचे तातडीने निपटारा लावावा अशा मागण्या जोर धरू लागल्या आहेत.






