अमळनेरात राष्ट्रीय किसान मोर्चा ने केंद्र सरकारच्या किसान विरोधी कायद्याचा केला विरोध
अमळनेर शहरप्रतिनिधी,आज राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगदाळे व तालुकाध्यक्ष रमेश पाटील नेतृत्वाखाली अमळनेर येथे केंद्र सरकारने किसान विरोधी केलेल्या कायद्याच्या विरोधात अमळनेर तहसिलदार मिलिंद वाघ यांना निवेदन दिले .
सदर निवेदनात ,दि ५/६/२०२० रोजीचा केंद्र सरकार चा कायदा शेतकरी हिताचा नसून पुंजीपती , व्यापाऱ्यांच्या जास्त हिताचा आहे. त्यामुळे यामुळे संपूर्ण देशात शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चा मार्फत आज दि १४/९/२०२० रोजी संपूर्ण देशात तिसऱ्या शृंखलातील देशव्यापी आंदोलन संपूर्ण भारतातील तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात येत आहे.
केंद्र सरकारन किसान विरोधी अध्यादेश पारित केलेले आहे १)The Farmers (Empowerment & Protection) Agreement on price Assurance And Farm Services Ordinance.२) Farmers Produce Trade & Commerce Promotion & Financial. 3)The Essential Commodities (Amendment) Act 1955 ,सदर किसान विरोधी कायदे वापस घ्यावे म्हणून निवेदन देण्यात येत आहे.
यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगदाळे व तालुकाध्यक्ष रमेश पाटील, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे तालुका अध्यक्ष नाविदभाई शेख, शहराध्यक्ष गुलाबनबी, नगरसेवक श्याम पाटील, छत्रपती क्रांती सेनाचे तालुका अध्यक्ष दयाराम पाटील आदिं उपस्थित होते.






