आदिवासी विद्यार्थ्यांना युपीएससी कोचिंगसाठी दिल्लीत पाठवा
पुणे – प्रतिनिधी ( दिलीप आंबवणे )
महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विद्यार्थी हा आय.ए.एस / आय.पी.एस / आय.एफ.एस/ आय.आर.एस झाला पाहिजे. याकरिता युपीएससीच्या कोचिंगसाठी
त्यांना थेट दिल्लीत पाठवावे. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे , आदिवासी विकास मंत्री अँड.के.सी.पाडवी यांचेकडे बिरसा क्रांती दलाचे महासचिव प्रमोद घोडाम यांनी केली आहे.
पुढे निवेदनात म्हटले की,डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणेच्या वतीने अनुसूचित जातीकरीता, तर छत्रपती शाहू महाराज संशोधन ,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी ) पुणेच्या वतीने मराठा – कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना युपीएससी कोचिंग क्लाससाठी दरवर्षी दिल्लीला पाठविण्यात येतात व त्यांना सुविधा पुरविली जातात.
आता यावर्षी पासून महाज्योती योजनेद्वारे इतर मागासवर्गीय ५०० विद्यार्थ्यांना युपीएससी कोचिंग क्लाससाठी दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. कोचिंगला पाठविण्यापूर्वी त्यांची प्रवेश परीक्षा घेतली जाते.
आदिवासी विद्यार्थी हा सुद्धा आय.ए.एस/आय.पी.एस/आय.एफ एस/ आय.आर.एस झाला पाहिजे.
या करीता बार्टी,सारथी,महाज्योती च्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाकडून स्वतंत्र योजना तयार करुन , आर्थिक तरतूद करावी.आणि या सारखीच आदिवासी विद्यार्थ्यांचीही प्रवेश परीक्षा घेऊन यांनाही दिल्लीत दरवर्षी युपीएससी कोचिंगसाठी ५०० विद्यार्थ्यांना पाठविण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांतही क्षमता आहे. पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही. गरिबीमुळे दिल्ली गाठू शकत नाही. संधी उपलब्ध करुन दिल्यास संधीचे सोने निश्चित करतील.अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.






