Ausa

तपसे चिंचोली येथील बचत गटाच्या महिला व गावकऱ्यांनी दारु विक्रेत्यांना दिला चोप

तपसे चिंचोली येथील बचत गटाच्या महिला व गावकऱ्यांनी दारु विक्रेत्यांना दिला चोपसंतप्त महिलांची किल्लारी पोलिसांकडे तात्काळ दारू बंदीची मागणीऔसा लातुर प्रतिनिधी:–प्रशांत नेटकेऔसा तालुक्यातील तपसे चिंचोली आणि लामजना येथे अवैध दारूविक्रीमोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या प्रकरणी गावातील बचत गटाच्या महिला आणि गावातील लोक यांनी एकत्रित येऊन अवैध दारूविक्री करणाऱ्या रुक्मिणी विठ्ठल येरनुळे, आणि लामजना येथील श्रीमंत पवार या विक्रेत्याला चोप दिला .तपसे चिंचोली येथील दारूविक्री करणाऱ्या सुमा बाबू नेटके ह्या सापडू शकल्या नाहीत. गावकऱ्यांनी दारूच्या बाटल्या जाग्यावर फोडल्या तसेच देशी दारूच्या ५१ आणि इंग्लिश कंपनीच्या ११ बॉटल जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिल्या.यावेळी किल्लारी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे , उमाकांत चपटे यांच्यासह किल्लारी पोलीस स्टेशन टीम घटनास्थळी दाखल झाले होते.किल्लारी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्व दारू दुकाने येत्या तीन दिवसांत बंद करण्याची हमी पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी दिली आहे.

औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय चोरुन चालु आहे.जिल्ह्यात आगोदरच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे शेतकरी शेतमजूर हवालदिल झाले असून अशातच अवैध धंद्याला पेव फुटले असून अनेकांची घरे उध्वस्त होतानाचे चित्र पहावयास मिळत आहे . तरुण पिढी दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाले मुळे अनेक आजाराला सामोरे जावे लागत असल्याने याकडे स्वतः पोलीसनी लक्ष द्यावे अवैध दारु धंद्याला आळा घालावा.अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button