Nashik

नाशिक जिल्ह्यातील दहा तालुक्यात दुष्काळाचे चटके ५२ टॅकरद्वारे ७१ गावासह ४५ वाङ्याना पाणीपुरवठा.

नाशिक जिल्ह्यातील दहा तालुक्यात दुष्काळाचे चटके ५२ टॅकरद्वारे ७१ गावासह ४५ वाङ्याना पाणीपुरवठा.
शांताराम दुनबळे नाशिक
नाशिक : धरणाचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात आता सध्या दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत उन्हाच्या झळा त्रीव होताच पाणी टंचाई ला ग्रामीण भागात सुरवात झाली आहे नाशिक जिल्ह्यात सद्यसिस्थितीत ५२ टॅकरद्वारे ७१ गावे व ४५ वाड्यातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे .नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक टॅंकर हे येवला तालुक्यात असुन १८टॅकरद्वारे पाणीपुरवठा केला जात जात आहे. दरम्यान मान्सूनचं आगमनास उशीर झाल्यास जिल्ह्याचा घसा कोरडा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मागील वर्षी दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व धरणं ओहरफ्लो झाली होती नदी व नाले तुङुब भरून वाहत होते भुजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले त्यामुळे मागील दोन वर्षांपासून च्या तुलनेत यंदा फारशी पाणीटंचाई जाणवली नाही माञ तापमान पारा वाढत असल्याने तशी ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवू लागली नदी नाले आटवू लागले तर विहीरी नी तळ गाठला आहे त्यामुळे टॅंकर च्या मागणीत वाढ होत आहे सद्यसिस्थितीत जिल्ह्यात ५२ टॅंकर सुरू असुन गेल्या वर्षी ह्या कालावधीत टॅंकर ची संख्या ५० च्या आसपास होती.दुष्काळाचे तालुके म्हणून ओळख असलेले येवला बागलाण यासह अतिवृष्टी साठी ओळखला जाणारा पेठ हा तालुक्यात पाणीटंचाई जाणवत आहे सद्यसिस्थितीत येवला १८,बागलाण ५,चादंवङ ६,पेठ ७,देवळा २,इगतपुरी ३,मालेगाव ३,नांदगाव १,सुरगाणा ५,ञ्यंबकेश्वर २,यांना सात शासकीय व४५ खाजगी टॅकरद्वारे १२२ फेरीच्या माध्यमातून ९६ हजार ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी ५४ विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या असुन नाशिक निफाङ सिन्नर दिङोरी कळवण हे तालुके टॅकरमुक्त आहेत मान्सून जुन च्या पहिल्या आठवड्यात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे मान्सून ला उशीर झाल्यास नाशिक जिल्ह्यात त्रीव पाणीटंचाई जाणवू शकते परिणामी टॅंकर च्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत कोरोना संकटात प्रांत अधिकारी यांना टॅंकर मंजुरी चे अधिकार देण्यात आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button