Pandharpur

गर्दी टाळून पंढरपूर नगरपालिकेने दिलेल्या नियमानुसार श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करा डॉ शितल के शहा

गर्दी टाळून पंढरपूर नगरपालिकेने दिलेल्या नियमानुसार श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करा डॉ शितल के शहा

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरांमधील कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्णसंख्या विचारात घेता येत्या गणेश उत्सव साजरी करण्यात येत असलेल्या या सणाच्या पार्श्वभूमिवर शासनाने खबरदारी म्हणून काही प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.राज्यात कोरोनामुळे सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्या अनुषंगाने श्री गणेश उत्सव किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून गणरायाच्या भाविक भक्तांनी व बांधवांनी नियमाचे उल्लंघन न करता शासनाचे आदेशामध्ये दिलेल्या कलमांचे पालन करावे.

नागरिकांनी शक्यतो प्रतीकात्मक गणेश विसर्जन करावी, असे आव्हान डॉ शितल के शहा यांनी सोशल मीडियाच्या द्वारे केले आहे त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, सर्वांनी नियमांचे पालन करावे व शासनाच्या आदेशाला केराची टोपली न दाखवता शासनाचे परिपत्रक प्रमाणे गणेश विसर्जन साजरी करावी व गणरायाच्या भाविक भक्तांना सोशल मीडियाच्या आधारे शुभेच्छा देत आहे असे असे आव्हान डॉ शितल के शहा यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button