Chimur

? शिवमचा नरबळी प्रकरण..  परिवाराचा आरोप पोलीस प्रशासन करत आहे टाळाटाळ

शिवमचा नरबळी प्रकरण परिवाराचा आरोप पोलीस प्रशासन करत आहे टाळाटाळ

प्रतिनिधी चिमूर ज्ञानेश्वर जुमनाके

शंकरपूर येथील नवव्या वर्गातील शिवम मनोहर भानारकर यांच्या मृत्यू ला दोन महिने उलटले तरी पोलीस जाणून बुजून खऱ्या खुन्या अटक करण्यात आणि चौकशी करण्यात टाळाटाळ करीत आहेत। सात डिसेंबर 2019 शनिवार ला गावापासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर शेतात असलेल्या इलेक्ट्रिक टॉवर च्या खाली मृतदेह आढळला। पोलीस जाणून बुजून आत्महत्याच आहे असे सांगून चौकशी करीत होते संयमी, मितभाषी, लाजाळू, स्वतःच्या सुद्धा वावरात न जाणारा शिवम अडचणीच्या ठिकाणी दूर तीन किलोमीटर अंतरावर कशाला जाणार यावर पोलीस ऐकायला तयार नव्हते आणि आजही नाही अख्ख्या शंकरपूर गावात माहीत आहे की ही घातपात ची केस आहे तरी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना ही आत्महत्या च का दिसावी हा प्रश्न आईवडील विचारत आहेत.

सर्वसाधारण नागरिक जरी प्रत्यक्ष दर्शी असले तरी पोलीस केस असल्याने पुढे येऊन बोलायला आणि साक्षी द्यायला घाबरतात पण मृत शिवम ला सकाळी मोटारसायकल वर बसवून नेण्यात आले मोटारसायकल वर पुढे एक गावात आलेला पाहुणा बसला होता आणि पाठीमागे माना समाजाचा शंकरपूर येथील बेघर एरियात राहणारा गृहस्थ बसला होता आणि मध्ये शिवम ला बसविण्यात आले होते अशी माहिती देणारी महिला भानारकर दाम्पत्याचे मागे सक्षमपणे उभी आहे पण शंकरपूर येथील पोलीस कर्मचारी जांभळे तिला कॉन्फ्युज करण्याचा प्रयत्न करून केस रफादफा करण्याचा प्रयत्न करीत आहे त्या प्रत्यक्षदर्शी महिलेला खोटे कसे दाखविता येईल, तिचे मानसिक संतुलन बिघडले हे कसे सिद्ध करता येईल, तिला frustrate आणि demorlize कसे करता येईल यासाठी अख्खी पोलीस यंत्रणा काम करीत आहे शिवम चे आईवडील आतापर्यंत बऱ्याच नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना भेटून जीवाचा आटापिटा करीत आहेत सुरवातीला नागपुर येथे गृहमंत्र्यांना भेटले त्यांनी चंद्रपूर येथे एसपी साहेब रेड्डी ला फोन केला एसपी साहेब रेड्डी यांना शिवम चे आईवडील आणि कार्यकर्ते दोनदा भेटले चंद्रपूर येथिल एसपी साहेबानी हे प्रकरण मूल येथील आय पी एस अधिकारी तारे साहेबांना यांना हॅंडओव्हर केले शंकरपूर येथील पोलीस अधिकारी जाणुनबुजून इतर पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत आहेत सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी जांभळे यांनी दिलेल्या माहितीनुसार काम करीत असल्याने चौकशी रेंगाळलेली आहे आणि दिशाहीन झाली आहे.

ज्या बाईने शिवम ला नेणाऱ्या मोटारसायकल स्वारांची माहिती दिली तिलाच शंकरपूर ला नियुक्त असलेले पोलीस जांभळे जास्त त्रास देत आहे एका निडर आणि सक्षम बाईवर वैयक्तिक चिकलफेक करून तिची बदनामी करीत आहेत त्यामुळे मूल येथील आय पी एस अधिकारी तारे साहेब यांनी परत एक प्रत्यक्ष दर्शी शोधायला सांगितले ज्या इलेक्ट्रिक टॉवर खाली शिवम चा मृतदेह आढळला त्या शेताजवळ शेत असलेले एक गृहस्थ प्रत्यक्षदर्शी मिळाले ज्यांनी शिवम ला मोटारसायकल वर नेताना बघितले मूल चे आय पी एस अधिकारी श्री तारे यांनी स्वतः छानबिन केली आणि भिसी पोलीस अधिकाऱ्यांना मर्डर च्या अनुषंगाने चौकशी चे आदेश दिले पण चिमूर भिसी पोलीस अधिकारी तशे न करता शिवम च्या घरच्या लोकांनाच त्रास देत आहेत.

? शिवमचा नरबळी प्रकरण..  परिवाराचा आरोप पोलीस प्रशासन करत आहे टाळाटाळ

मोटारसायकल स्वारांना ताब्यात घेऊन चौकशी न करता उलट शिवम च्या मोठ्या भावाच्या कॉलेज मध्ये जाऊन चौकशी केली आणि उलटसुलट प्रश्न विचारले शिवम ला मोटारसायकल वर बसवून नेणाऱ्या व्यक्तींना पोलीस कास्टडी मध्ये घेऊन, दोन फटके मारून बोलते करण्यापेक्षा अन्यायग्रस्थ तक्रारकर्त्यालाच आणि साक्षीदारांना त्रास देत आहेत हे दुरदेवी साधा दारू विक्रेता आरोपी ची कुणकुण लागली तरी त्याला अंदर घेऊन बोलते केले असते कारण त्यांचेकडून पैसे मिळतात पोलीस अधिकाऱ्यांना पैशाची चटक असल्याने कोणी मेले काय गेले काय, कोना गरीबावर अन्याय अत्याचार झाला काय, कोणत्या मायबापावर काय बितते, गरीब मायबापा च्या अश्रु चे यांना काही घेणेदेणे नाही जिथून पैसा मिळतो फक्त त्यांना साथ द्या गुन्हा कोणाचाही असो अशी भूमिका पोलीस लोकांची असल्याने शिवम च्या मृत्यू चा उलगडा होत नाही आणि चिमूर परिसरातील एकही राजकीय नेते आणि समाज सेवक शिवम च्या प्रकरणा मध्ये समोर आलेला नाही एकही दैनिक वृत्त पत्रात आणि मीडियावर शिवम च्या प्रकरणात संदर्भात न्याय मिळवून देण्यासाठी बातम्या आल्या नाही कारण शिवम च्या घरच्या लोकांना आपल्या गावचे पत्रकार परिषद सोडून चंद्रपूर मध्ये जाऊन पत्रकार परिषद घ्यावी लागते ही शोकांतिका आहे कारण या प्रकरणात राजकीय लोक व पक्ष नेते हस्तक्षेप तर नाही करत आहे म्हणून तर या प्रकरणात अजून पर्यन्त चोकशी झाली नाही कारण म्हणजे आता ही लोकशाही नसून ही हुकूमशाही आहे हेच प्रकरण कोण्या एका मोठ्या किव्हा राजकीय नेत्याचे असते तर पूर्ण यंत्रणा कामी लागून प्रकरणाची चोकशी करून आरोपीला अटक करण्यात आली असती हे ठरले गरीब लोक म्हणून आम्हाला न्याय मिळाला नाही कारण आमची राजकीय पक्ष आणि नेत्या मध्ये ओळख नाही यंत्रणा चालवनारे हे राजकीय नेते असतात हे आम्हाला दिसून येत आहे शिवम च्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी आणि या प्रकरणाची चौकशी सुरू करावी असा आस आणि विचार घेऊन शिवम चे आई बाबा आणि त्यांचे हितचिंतकांचे लोकांच्या दारोदारी फिरत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button