Karnatak

श्री संत राघोबा व श्री संत रघुनाथ महाराज यांचा काला संपन्न

श्री संत राघोबा व श्री संत रघुनाथ महाराज यांचा काला संपन्न

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलसूर येथील श्री संत राघोबा व श्री संत रघुनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त दि.१५ ते २२ पर्यंत अंखड हरीनाम सप्ताह ज्ञानेश्वर पारायण, काकडा आरती, गाथा भजन, हरी किर्तण व संगीत भजन असे नित्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
व्यासपीठ प्रमुख श्री हभप सुरेश महाराज मदकट्टीकर सात दिवस ज्ञानेश्वर पारायण, गाथा भजन व हरी किर्तण सेवा तसेच काला किर्तण सुरेश महाराज मदकट्टीकर यांनी केले.
शुक्रवारी सांयकाळी श्री संत रघुनाथ महाराज मठापासुन ते थेर मैदाना पर्यंत टाळ म्रदंगाच्या तालावर गजरात श्री संत रघुनाथ महाराज यांची मिरवणूक व पालखी सोहळा काढण्यात आला व त्याठिकाणी काला फोडण्यात आला व मठात महाप्रसाद देण्यात आला.
यावेळी धनाजी बिरादार मदकट्टीकर, ता.पं.सदस्य गोविंदराव सोमवंशी, हुलसूर तालुका व बसवकल्याण जिल्हा आंदोलनाचे संचालक एम.जी.राजोळे, ओमकार पटणे, चंद्रकांत देटणे,प्रभूराव भुसारे, श्रीमंतराव जानबा, पंडितराव भुसारे, माजी जि.पं.अध्यक्ष अनिल भुसारे, शांताताई मुस्तापुरे गावातील आदी नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button