श्री मंगळ ग्रह मंदिरात तुलसी विवाह महासोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा
अमळनेर – येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात आज दरवर्षी प्रमाणे भव्य स्वरुपात तुलसी विवाह महासोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पूजेच्या अकरा मानकऱ्यांपैकी बाजार समितीचे व खा.शि.मंडळाचे संचालक हरी भिका वाणी मुख्य यजमान होते. पोलीस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे,तहसीलदार संदीप वाघ , माजी नगरसेवक संजय पाटील,सोनार-सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वर्मा, ‘डीपीडिसी’चे सदस्य पंकज चौधरी,उपप्राचार्य प्रा. प्रवीण भावसार,प्रतिष्ठित व्यापारी दामुशेठ गोकलानी , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब महाजन , जे. डी. कोठावदे, संजय सोनजे मानकरी होते. संजय एकतारे आणि सुनील वाघ यांनी वर व वधूच्या मामाची भूमिका निभावली.तत्पूर्वी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी पालखी पूजन करून मानकऱ्यांचे स्वागत केले
यावेळीआमदार सौ.स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील व , जि. प.सदस्या जयश्री पाटील , जेष्ठ नेत्या ऍड. ललिता पाटील,तिलोत्तमा पाटील, आदींसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांसह स्त्री-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराचे पुजारी प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. त्यांना पुजारी तुषार दीक्षित व जयेंद्र वैद्य तसेच शहरातील काही पुरोहितांनी सहकार्य केले.
यावेळी तुळशीच्या कुंडीला साक्षात वधू राणीच्या वेषात सजविण्यात आले होते.विवाह मंडपात प्रतीक स्वरूपात भगवान श्रीकृष्णाचीही मूर्ती होती. मंदिर व परिसराला अत्यंत मनोहारीरित्या पाने,फुले, केळीचे खांब,रांगोळ्या व रोषणाईने सजविण्यात आले होते. सर्वांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.






