Maharashtra

दुध उत्पादकांना अनूदान द्या अन्यथा 1ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन… महायूतीचा इशारा

दुध उत्पादकांना अनूदान द्या अन्यथा 1ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन… महायूतीचा इशारा

प्रतिनिधी मनोज भोसले

भाजप,रासप,रयत क्रांती, रिपाई आठवले गटव शिवसंग्राम महायूतीच्या वतीने चाळीसगाव येथे मा.तहसीलदार श्री. अतूलजी मोरे यांना निवेदन सादर करण्यात आले.दुध उत्पादकांना सरसकट 10रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो 50रूपये अनुदान मिळणेबाबत राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली.ही मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला

कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संकटात शेतकरी बांधवांनी जीव धोक्यात घालून जीवनावश्यक दुध उत्पादनाचे काम केले. मात्र सद्यस्थितीत दुधाचे भाव अतिशय कमी झाले आहेत. उत्पादन खर्च सूध्दा निघत नाही .आणि त्यातच महाराष्ट्र शासनाने दुध उत्पादकांना मिळणारे अनूदान बंद केले आहे. म्हणून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी हे निवेदन आज राज्यभर सादर करण्यात आले*

*चाळीसगाव येथे हे निवेदन सादर करताना भाजपा तालूकाध्यक्ष प्रा.सूनील निकम,शहराध्यक्ष श्री.घृष्णेश्वर पाटील, रिपाई आठवले गटाचे जळगाव जिल्हाप्रमुख श्री. आनंद खरात,राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.विठ्ठलराव शिंगाडे,रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. श्री. अजय पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालूकाध्यक्ष श्री. रवींद्र पाटील, रिपाई आठवले गटाचे तालूकाध्यक्ष श्री. कैलास सूर्यवंशी, रयत क्रांती संघटनेचे शहराध्यक्ष श्री. पप्पूदादा पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस श्री. अमोल चव्हाण, तालुका भाजपा सोशलमिडीया प्रमुख श्री. बाजीराव अहिरे,यूवामोर्चा पदाधिकारी श्री. निळकंठ पाटील,टाकळीचे सरपंच श्री. शाम गवळी, वाघळीचे सरपंच श्री. विकास चौधरी, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष श्री. किशोर रणधीर,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button