Amalner

Amalner: लोकमान्य विद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य  टिळक पुणयतिथी निमित्त कार्यक्रम…

Amalner: लोकमान्य विद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुणयतिथी निमित्त कार्यक्रम…

अमळनेर शहरातील शाळांमधे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय अमळनेर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमा साठी संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. बहुगुणे, शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे, जेष्ठ शिक्षक मनोहर महाजन, जे.के चौधरी, जेष्ठ शिक्षिका मनिषा खांजोडकर उपस्थित होते. विद्यार्थानी लोकमान्य टिळक व शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्र वर मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन माधुरी सोनार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सुर्यवंशी यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button