Ausa

कोरोनाच्या सावटाखाली नागपंचमी सण साजरा…

कोरोनाच्या सावटाखाली नागपंचमी सण साजरा

प्रशांत नेटके

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.नागपंचमी हा मराठमोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो . विशेषकरून नवविवाहिता या सणाला माहेरी येतात.पण यावर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने नागपंचमी सणावर कोरोनाचे सावट पसरल्याचे दिसून आले.कोरोना लॉकडाऊन मुळे या सणावर मर्यादा येत असल्याचे दिसून येत आहे.झोक्याचा सण नागपंचमी शनिवारी सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात आला. इतर सणाप्रमाणे नागपंचमी सणावर कोरोनाचे सावट पसरल्याचे दिसून आले. तपसे चिंचोली परिसरात यावर्षी चांगला पाऊस झाला असल्याने शेतकरी वर्गात समाधानी आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मात्र यावर्षी या सणाचा उत्साह कमी असल्याचे दिसून आले.कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन पाळला जात आहे.यामुळें सर्वच सण घरच्या घरी साजरे केले जात आहेत. त्यामुळे सणाचा आनंदोत्सव कमी होऊन सणाचे रंगरूप पालटून जात आहेत.

तरीसुद्धा झोक्याचा आनंद घेण्यासाठी लहान थोरांची लगबग सुरु असल्याचे दिसून आले. सासरी गेलेल्या नवविवाहिता खास करून पंचमीला माहेरी एकत्र येतात. चारचौघी मैत्रिणी एकत्र येऊन झोक्याचा आनंद लुटतात. यावेळी झोक्यावर बसून आनंदोत्सव गाणारी गीते ऐकायला मिळाली नाहीत. पण लहान सहान मोठ्या दिमाखात झोका उंचच उंच भरारी घेतात. यंदा कोरोना लॉकडाऊन असल्याने गावोगावी लेकीबाळी कमी प्रमाणात आल्याचे दिसून आले. वृक्षाच्या वाढत्या तोडीमुळे वृक्षाच्या कमी संख्येमुळे झोका कुठे बांधावे हा प्रश्न देखील गंभीर होत असल्याचे चित्र समोर येत आहे.खासखरून हा सण महिलां करिता प्रसिद्ध आहे.*म्हणून नागपंचमी साजरी केली जाते*भगवान शंकराला श्रावण मासातील आराध्य दैवत मानले जाते. त्यामुळे या भगवान शंकराच्या गळ्याभोवती विराजमान असलेल्या नागालाही तितकेच विशेष महत्त्व दिले जाते. म्हणूनच नागपंचमीला नागाची पूजा विशेष मानली जाते. श्रावण महिना हा पावसाचा म्हणजेच वर्षा ऋतू असतो. ज्यामुळे भूगर्भातील नाग बाहेर भूतलावर येतात. त्यामुळे भूतलावरच्या लोकांना त्यांचा त्रास होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमी साजरी केली जाते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button