Nandurbar

एम आई एम नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी सैय्यद रफअत हुसैन यांची फेरनिवड.

एम आई एम नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी सैय्यद रफअत हुसैन यांची फेरनिवड.

नंदुरबार फहिम शेख

एम आई एम पक्ष अध्यक्ष व खासदार बर्रिस्टर असदुद्दिन ओवैसी साहेवांचे आदेशान्वय तसेच महाराष्ट्रा प्रदेश अध्यक्ष व खासदार सैय्यद इम्तियाज जलील साहेबांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी साहेबांनी संपूर्ण राज्याची कार्यकारिणी बरखास्त केली होती, नंतर जिल्हा- जिल्हा दौरे करून त्यांनी संगठनात्मक द्रुश्ट्या अहवाल घेतला व वरिष्ठांशी चर्चा करून आज शुक्रवार रोजी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे सर्व जिल्ह्यातील जबाबदारांना बोलावून नियुक्तीची प्रमाणपत्र देऊन निवड केली. रफअत हुसैन यांची कर्तव्यनिष्ठा व कारकिर्द पाहुन त्यांना पुनः नंदुरबार जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले असुन ते सलग तिसऱ्यांदा या पदावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या कारकीर्दीत शहादा येथे चार नगर सेवक एक स्विक्रुत नगर सेवक तसेच अक्कलकुआ येथे लोक नियुक्त सरपंच निवडुन आणले असुन मागिल आठ वर्षात त्यांनी विविध क्षेत्रात पक्षाच्या झेण्ड्या खाली समाजहितासाठी अहोरात्र मेहनत केली आहे.
सामाजिक , राजकीय व इतर क्षेत्रातून त्यांची स्तुती व अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button