महाराष्ट्रातील विविध डॉक्टर्स संघटना पदाधिकाऱ्यांनी घेतली मा.ना. शरदचंद्र पवार साहेब यांची भेट.
औरंगाबाद :- गणेश ढेंबरे.
आज HIMPAM, NIMA, IMA प्रतिनिधींनी मा. ना.शरदचंद्र पवार साहेब (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) यांची सिल्व्हर ओक या निवास स्थानी महाराष्ट्रातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसाठी भेट घेतली. या वेळी शिष्टमंडळाने खालील मुद्दे पवार साहेबांच्या निदर्शनास आणून दिले.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या वैद्यकिय व्यावसायिकांना 50 लाख विमा देण्यात यावा. शासकीय सेवेत असणाऱ्या सर्व AYUSH वैद्यकीय व्यावसायिकांना MBBS इतकेच समान वेतन देण्यात यावे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना PERSONAL PROTECTIVE EQUIPMENTS (PPE KITS) सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्याव्यात. मा. जिल्हाधिकारी, मा. मनपा आयुक्त यांच्या आदेशानुसार कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय सेवा निरंतर पुरवणाऱ्या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा ही शासन अधिग्रहित सेवा आहे समजण्यात यावे व त्यांनाही केंद्र शासनाचे ५० लाखाचे विमा कवच प्रदान करण्यात यावे असे स्पष्ट मत चर्चेअंती व संबंधित कागदपत्रांची बारकाईने तपासणी करून मा. शरद पवार साहेबांनी व्यक्त केले.
यावेळी ना. शरदचंद्र पवार साहेबानी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच मंत्री गटाच्या मिटिंगच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही दिली. या प्रसंगी डॉ. एस.टी. गोसावी (अध्यक्ष, हिम्पाम महाराष्ट्र; शासन नामनिर्देशित सदस्य महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद), डॉ. विनायक म्हात्रे (NIMA प्रतिनिधी), डॉ. अविनाश भोंडवे ( IMA प्रतिनिधी), डॉ सौ नलिनी नाडकर्णी (HIMPAM), डॉ सी. व्ही. पाटील (सचिव, हिम्पाम महाराष्ट्र) डॉ. एम. आर. काटकर (सह खजिनदार हिम्पाम महाराष्ट्र), डॉ. अविनाश पवार सचिव NCP डॉक्टर सेल उपस्थित होते.






