Amalner

भाषा ही संस्कार व संस्कृतीची वाहक जेष्ठ शिक्षक अरूण सोनटक्के

भाषा ही संस्कार व संस्कृतीची वाहक..जेष्ठ शिक्षक अरूण सोनटक्के

अमळनेर प्रतिनिधी-

देवगांव देवळी महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना मराठी विषयाचे जेष्ठ शिक्षक अरूण सोनटक्के यांनी सांगितले की साहित्य ही माणूस संसारातील समर्थ वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहतो. संस्कृती आणि संस्काराच्या प्रवाहात सातत्य राखण्याचे काम भाषा करत असते .म्हणून मातृभाषेची संस्कार व संस्कृतीची वाहक आहे .याचसाठी आपण आपल्या मातृभाषेचा अर्थात मराठी भाषेचा वापर केला पाहीजे. मराठीचा सन्मान हाच महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र संस्कृतीचा सन्मान आहे असे मार्गदर्शन करतांना सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.शाळेत आठवी नववीच्या विदयार्थ्यांनीं कवीता,म्हणी,वाक्प्रचार सादर केले. तर अध्यक्षीय भाषणातून शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी मराठी मातृभाषेचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेचे शिक्षक आय.आर.महाजन यांनी केले. तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक एस.के.महाजन यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button