Kolhapur

अनंतशांती संस्थेचे कार्य समाजाला प्रेरणादायी हिताचे : अमित वेंगुर्लेकर

अनंतशांती संस्थेचे कार्य समाजाला प्रेरणादायी हिताचे : अमित वेंगुर्लेकर

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : तळागाळात काम करणाऱ्या आणि समाजासाठी आपले योगदान देणाऱ्या लोकांची निवड करून त्यांना पाठबळ देण्याचे काम अनंतशांती सामाजिक संस्था करत आहे.असे प्रतिपादन ह्युमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्ट चे प्रदेश महासचिव अमित वेंगुर्लेकर यांनी केले. ते अनंतशांती सामाजिक संस्थेने वितरित केलेल्या सामाजिक आणि जिजाऊ पुरस्कार प्रसंगी बोलत होत.अध्यक्षस्थानी महंमद शेख हे होते.
रविश पाटील पुढे म्हणाले.आजकाल समाजात असे पुरस्कार देऊन पाठबळ देणारे लोक मोजकेच आहेत.अनंतशांतीने सर्वसामान्य लोकांना पुरस्कार देऊन आणखीन काम करण्याची त्यांच्यात उर्जा निर्माण केली आहे.असेच कार्य या संस्थेने राबवावे.
कार्यक्रमात रविश पाटील, अमित वेंगुर्लेकर ,अनिशा पाटील,प्रकाश कांनकेकर सर,संजय शिंदे आदींनी आपली मनोगते व्यक केलीत
कार्यक्रमात ४०च्या वर माहिला व पुरुष यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.प्रमाणपत्र व ट्रॉफी व मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते.
जिजाऊ पुरस्कार असे- श्वेता पोवार,अनिशा पाटील, वैशाली चौगले,सविता जाधव, शैलजा कांनकेकर ,सविता बुगडे,सविता कवडे, सुवर्णा पाटील,आश्विनी शिंदे,सुजाता हुंदळकर,रेश्मा पाटील,मदिना मुजावर ,ज्योती नगारे आदी तर स्वामी विवेकानंद पुरस्कार कर्ते -रविष पाटील,सुभाष चौगले,रणजित जाधव,सम्राट शेंडगे,साताप्पा कुरणे,उमेश पोवार, एकनाथ पाटील,डॉ.एस. डी. पाटील,सचिन चौगले,सर्जेराव पाटील,शाम चौगले,समीर मकांनदार,सतीश शिंदे,सागर सावंत,चंद्रकांत बुगडे,आदी
कार्यक्रमास संस्थापक अद्यक्ष भगवान गुरव,मदन कोरे,राविष पाटील,महंमद शेख,अमित वेंगुर्लेकर,संजय शिंदे,महेश नंदे, प्रकाश कांनकेकर सर,अभिजित शिंदे,श्वेता पोवार,अनिशा पाटील ,आदी मान्यवर उपस्थित होते,या कार्यक्रमास मदन कोरे (सर) संकल्प अॕकडमी यांनी मोलाचे सहकार्य केले.
स्वागत संदीप कांबळे यांनी, सूत्रसंचालन शाम चौगले यांनी तर आभार अभिजित कांबळे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button