?️अमळनेर कट्टा…पोलिसांची वाळू चोरांवर कार्यवाही…हिंगोणे येथे 2 ट्रॅकटर जप्त…
अमळनेर ०५/०७/२०२१ रोजी सकाळचे वेळेस मा. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यानां मिळालेल्या गोपणीय बातमी नुसार हिंगोणे गावाचे जवळ बोरी नदि चे पात्रातुन काही ट्रॅक्टर वरील चालक हे गौण खनिज ची चोरी करुन ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये भरुन वाहतुक करीत आहेत बाबत त्याचे पथकातील पोहेकॉ अरुण बागुल पोकों/ आशिष गायकवाड, पोकाँ /राहुल पाटील, पोकाँ/ अमोल पाटील यानां खात्री करुन कायदेशीर कारवाई करण्याचे सागीतले वरुन नमुद पथकातील अमलदार यानी सदर
भागात जात असता आज दिनांक ०५/०७/२०२१ रोजी सकाळी ०६.०० वा. चे सुमारास अमळेर शहरातील पैलाड बागात बोरी नदिच्या पुलाजवळ रोडवर (१)एक स्वराज कंपणीचे निळ्या रंगाचे ट्रक्टर ट्रॉलीमध्ये सुमारे ०१ ब्रास वाळु भरुन चालकनामे प्रकाश भिवा हातगंडे वय २७ रा. ताडेपुरा मंगल नगर अमळनेर हा
त्याचे मालक किरण रंगाराव पाटील रा. पैलाड अमळनेर याचे सागंणेवरुन वाळुची चोरटी वाहतुक करीत असताना मिळुन आलाआहे.
तसेच हिंगोणा गावाजवळ बोरी नदिचे पात्रात एक स्वराज कंपणीचे ट्रॅक्टर ट्राली क्रमांक एम एच १९ बीजी इंजिन नं. ७५५८ dc ३००९sdb०५०४७ मध्ये भरलेली रेती ही नमुद चालक याने दुरुन पोलीसाना पाहुन जागीच उपसुन ट्रॅक्टर नदितच सोडुन पळुन गेला असुन नमुद दोन्ही ट्रॅक्टर वरील चालक व मालक याचे विरुध्दध पोकाँ /राहुल पाटील यानी फिर्याद दिलेवरुन भादवि कलम ३७९ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात दोन्ही ट्रॅक्टर व ०१ ब्रास वाळु सह असा सात लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन चालक प्रकाश भिवा हातगंडे यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. नमुद गुन्हयाचा तपास पोना/ कैलास शिंदे हे करीत आहेत.






