ऑनलाईन मटका चालविणाऱ्या एका इसमास अटक
दत्ता पारेकर पुणे
पुणे : इंदापुर शहरात बेकायदेशीर ऑनलाईन मटका खेळविणाऱ्यावर इंदापूर पोलीसांनी गोपणीय माहितीच्या आधारावर छापा टाकून कारवाई केली आहे.या कारवाईत 1 लाख 46 हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून याबाबत निलेश आत्माराम फडणीस पोलीस काँन्सेबल यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून आरोपी महेंद्र पांडूरंग फलफले, वय 21 वर्षे रा.गलांडवाडी नं.1, ता. इंदापूर, जि.पुणे यांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय सुत्रधाराकडून इंदापूर पोलीसांना इंदापूर शहरातील मंडईलगत असलेल्या गाळयात महेंद्र पांडूरंग फलफले नावाचा इसम आपले ओळखीचे लोकांकडून पैसे घेवून संगणकाच्या मदतीने ऑनलाईन मटका खेळ खेळवित आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी या कामी पोलीस हवालदार दिपक पालके,पोलीस काँस्टेबल अर्जुन भालसिंग,विनोद मोरे,वैभव मदने ,अमोल गारूडी,संजय कोठावळे, विक्रम जमादार यांची टीम तयार करुन या अवैद्य मटक्यावर छापा टाकण्याच्या सुचना दिल्या.
वरील पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता मंडईलगत असलेल्या एका गाळयात महेंद्र पांडूरंग फलफले हा संगणकाच्या मदतीने ऑनलाईन मटका खेळवित असताना मिळून आला. या छाप्यात
५५ हजार किमतीचा एक काळे रंगाचा डेस्टॉक
५० हजार किमतीचा एल जी कंपनीचा एक काळे रंगाचा डेस्टॉक
१० रूपये किमतीचा एक वायफाय नेटवर्क रावटर
३० हजार रूपये किमतीचा एक काळे रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट.
७०० रुपये किमतीचा एक माऊस
५४० रूपये रोख रक्कम व ऑनलाईट मटका खेळविलेल्या आकडेमोड केलेली वही हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला






