कराडमध्ये पोहोचला कोरोना व्हायरस
2 संशयित रुग्णालयात :
कोल्हापूर ः आनिल पाटील
चीनमध्ये आणि तिथून जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हारसचे (coronavirus) 2 संशयित रुग्ण कराड मध्ये दाखल झाले आहेत. चीनहून कराडमध्ये परतलेल्या दोघांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली आहेत. त्यानंतर त्यांना तात्काळ st स्टँड शेजारच्या क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोरोनाव्हायरसच्या संशयित रुग्णासाठी क्रिटिकेअर रुग्णालयात विशेष वॉर्ड (Quarantine) तयार करण्यात आला आहे. या रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र सध्या त्यांना रुग्णांना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती कराड नगरपालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.कराड मधील सर्व सरकारी आणि खासगी डॉक्टरांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आलं आहे.
चीनहून कराड परतलेल्या कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसल्यास तात्काळ पालिका प्रशासनाला कळवून विशेष वॉर्डमध्ये भरती करावं, अशा सूचना कराड प्रशासनाने दिल्या आहेत.
क्रिटिकेअर रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाव्हायरसबाबत राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आणि त्यांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत.
कोरोनाव्हायरसची लक्षणं
? सर्दी
? ताप
? खोकला
? घसा खवखवणे
? श्वास घेताना त्रास
? डोकेदुखी
कोरनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी काय कराल?
?हात स्वच्छ धुवा
?शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा
? सर्दी-खोकला-तापाची लक्षणं दिसल्यास त्या व्यक्तीच्या जास्त संपर्कात राहू नका
? प्राण्यांपासून दूर राहा
चीनमध्ये 25 बळी, 10 शहरं ठप्प
हा व्हायरस डिसेंबर 2019 मध्ये अचानक आला आणि त्याने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. या व्हायरसने आतापर्यंत 25 जणांचा बळी घेतला आहे. तर 830 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही शहरं बंद ठेवण्यात आली आहेत.
सापामुळे पसरला व्हायरस
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चीनने ही शहरं बंद ठेवली असली, तरी या व्हायरसला लगाम घालण्यासाठी तो नेमका आला कुठून याचा शोध घेणं सुरू झालं आणि संशोधकांना अखेर धागा सापडलाच… कोरोना व्हायरसचा मूळ स्रोत साप असू शकतो, असा अंदाज संशोधकांनी आपल्या अभ्यासानंतर व्यक्त केला आहे.
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या या रुग्णांच्या शरीरातील व्हायरसचे नमुने वैज्ञानिकांनी तपासले आणि व्हायरस आणि इतर प्राण्यांच्या जेनेटिक आणि प्रोटिन कोडची तपासणी केली, तेव्हा तो सापाच्या जेनेटिक आणि प्रोटिन कोडशी मिळताजुळता असल्याचं दिसून आलं.
? कोरोना हा काय प्रकार आहे ?
कोरोना वायरस हे नाव व्हायरसच्या आकारावरून पडलं आहे. एखाद्या मुकुटाप्रमाणे, प्रभेसारखा दिसणारा हा व्हायरस आहे आणि तो हवेमार्फत पसरतो. श्वसनप्रणाली आणि गॅस्ट्रोइन्टेस्टाइनवर परिणाम करतो. याआधी severe acute respiratory syndrome corona virus (SARS-CoV) आणि Middle East respiratory syndrome corona virus (MERS-CoV) यांनी गेल्या 17 वर्षात शेकडो लोकांचे बळी घेतलेत. जागतिक आरोग्य संघटनेने चीनमधील या कोरोना व्हायरसला 2019-nCoVअसं नाव दिलं आहे.
MERS-CoV आणि SARS-CoV या कोरोना व्हायरसला झोनोटिक व्हायरल डिसीज म्हटलं जातं (zoonotic viral diseases) एखाद्या व्यक्तीला या आजाराची लागण थेट प्राण्यांमार्फत होते. मात्र नवीन क्रोनोव्हायरस व्यक्ती व्यक्तींमध्ये पसरत आहे, त्यामुळे गंभीर चिंता व्यक्त केली जाते आहे.
? भारतात स्क्रीनिंग सुरू
भारतात हा व्हायरस येऊ नये म्हणून केंद्र सरकारने पुरपूर काळजी घेतली आहे. चीनमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाते आहे. शिवाय चीनमधील भारतीय नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.






