Amalner

?️ अमळनेर कट्टा…पोलखोल..पॅसेंजर मधून येणाऱ्या प्रवाश्यांच्या गर्दीवर कोण नियंत्रण ठेवेल…?रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी…!प्रशासन सुस्त..प्रवासी मस्त..!ब्रेक द चेन च्या नियमांचा फज्जा..!

?️ अमळनेर कट्टा…पोलखोल…पॅसेंजर मधून येणाऱ्या प्रवाश्यांच्या गर्दीवर कोण नियंत्रण ठेवेल…रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी……?रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी…!प्रशासन सुस्त..प्रवासी मस्त..!ब्रेक द चेन च्या नियमांचा फज्जा..!
अमळनेर येथे रेल्वे स्थानकावर होणाऱ्या तुफान गर्दी होत आहे. सुरत येथून येणाऱ्या रात्री च्या पॅसेंजर मधून शेकडों च्या संख्येने लोक येत आहेत. या सर्व लोकांची कोणतीही कोरोना चाचणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच इथेही आल्या नंतर कोणतीही चाचणी करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. अमळनेर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ह्या प्रवाश्यांमुळे पुन्हा कोरोना रुग्ण वाढू शकतात.अशी भिती निर्माण झाली आहे.
प्रशासनाचे या बाबींकडे दुर्लक्ष होत असून फक्त दुकाने बंद करणे,बाजार बंद करणे,लोकांच्या अंगावर धावून जाणे,काठ्या लाठ्या हाणणे,ठराविकच भागात लक्ष ठेवून तिथेच नियोजन करणे इ म्हणजे कोव्हीड 19 चे नियोजन असा गैरसमज प्रांत यांचा कदाचित झालेला आहे. पण बँका मध्ये होणारी गर्दी,कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी गर्दी,आणि आता रेल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दी कडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.लोक झुंडी च्या झुंडी ने येत आहेत आणि कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. बँक मॅनेजर, रेल्वे स्टेशन मास्तर, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक,किंवा सभापती यांना काय निर्बन्ध किंवा सूचना प्रांत देत आहेत हा देखील वादाचा च मुद्दा आहे.कारण त्या पद्धतीच्या सुचना,चर्चा झाली आहे की नाही याबद्दल शंका उपस्थित होत आहे. बँका मध्ये थर्मल गन, ऑक्सिमिटर ची व्यवस्था नसून तुफान गर्दीत लोकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button