Amalner

महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेच्या 31 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेच्या 31 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

नूर खान

अमळनेर : प्रताप महाविद्यालय अमळनेर आणि महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेच्या 31 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे थाटात उद्घाटन संपन्न झाले.
उद्घाटनाच्या प्रारंभी वाणिज्य परिषदेचे समन्वयक व उपप्राचार्य प्रा.एस ओ माळी यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक मा. नीरज अग्रवाल यांनी माजी प्रतापीयन म्हणून आपले मनोगत व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेच्या 31 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटनप्राचार्य डॉ. ज्योती राणे यांनी आपल्या प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेतला. महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ.बबनराव तायवाडे यांनी परिषदेची भूमिका विशद केली. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी वाणिज्य परिषदेचे सचिव डॉ. जी .वाय. शितोळे यांनी परिषदेचा अहवाल सादर करून विविध पुरस्कारांचे वितरण केले.महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेच्या 31 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटनयाप्रसंगी अधिवेशनाचे उद्घाटक पारोळा -एरंडोल विधानसभेचे आमदार तथा माजी प्रतापीयन मा.आबासाहेब चिमणराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की वाणिज्य क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी आहेत आहेत. ग्रामीण भागातील विविध संशोधक पुढे यावेत . त्यांच्या द्वारे औद्योगिक क्षेत्र व्यापक व्हावे. नव्या पिढीला वाणिज्य व्यवस्थापन क्षेत्राबद्दल आवड निर्माण व्हावी. याशिवाय शेतीतून नवा रोजगार कसा निर्माण होईल यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित कसे करता येईल ? त्याकरिता प्रयत्न झाले पाहिजे. औद्योगिक क्षेत्रात विकासाची टक्केवारी वाढावी यासाठीचे संशोधन अभ्यासकांनी केले पाहिजे तसेच बेरोजगारी शेती व तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधन मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजे .शेतकऱ्यांना पाणी, 24 तास वीज आणि पिकांना योग्य भाव मिळाला पाहिजे. यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे .त्यासाठी राजकारणाचे शुद्धीकरण झाले पाहिजे .तसेच सत्तेचे बाजारीकरण थांबले पाहिजे. अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.त्यानंतर प्रताप महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. आर आर बहुगुणे यांनी वाणिज्य क्षेत्रातील प्राध्यापकांनी व अभ्यासकांनी वाणिज्य क्षेत्राकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. समाजभान आणि नोकरी-व्यवसाय चे भान देणारे शिक्षण दिले पाहिजे. समस्यांचे मूळ शिक्षण हेच शोधू शकते .समाजातील विदारक परिस्थिती बदलली पाहिजे. अशा परिषदा फक्त औपचारिक ठरू नयेत. त्या दिशादर्शक ठराव्यात असे प्रतिपादन केले.या अधिवेशनाचे अध्यक्ष तथा कला, वाणिज्य व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, बोदवडचे प्राचार्य मा. डॉ. अरविंद चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत ” वाणिज्य व्यवस्थापनातील आव्हाने आणि संधी” या विषयावर उद्बोधक विचार मांडले. तसेच त्यांनी जपान व भारत या देशाचे तुलनात्मक उदाहरण देऊन मांडणी केली. जपानने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व जिद्दीच्या जोरावर अल्प संसाधने व स्रोत असतानाही स्वतःची ओळख निर्माण केली .अर्थात आव्हाने असतानाही त्यांनी संध्या निर्माण केल्या. तद्वतच भारताने उपलब्ध असणाऱ्या स्रोतांच्या द्वारे अधिक विकास करावा तसेच उद्योग संस्थांना पाठबळ दिले गेले पाहिजे, स्थानिक संशोधकांनी यासाठी पुढे यावे. असे मत व्यक्त केले .त्याचप्रमाणे अधिवेशनाचे बीजभाषण नॉर्थ गुजरात युनिव्हर्सिटी, पाटण येथील व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता मा. डॉ
निशिथ कुमार भट यांनी वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील आव्हाने आणि संधी या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले .
दोन वेगवेगळया तांत्रिक सत्रांमध्ये 150 संशोधक प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. देशभरात आलेल्या अभ्यासकांनी आपले शोधनिबंध सादर केले. परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ.टी.ए. शिवारे, परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.पी
टी .चौधरी ,उपाध्यक्ष डॉ. ए .एम. गुरव, मुंबई विद्यापीठाचे वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.अजय भामरे परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. जी एम तल्हार तसेच वाणिज्य परिषदेचे सन्माननीय कार्यकारी सदस्य उपस्थित होते.अधिवेशनाला खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री अनिल पाटील (कदम), उपाध्यक्ष मा. श्री कमल कोचर, उपाध्यक्ष मा.सौ माधुरी पाटील, विश्वस्त मा. सौ वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष मा. श्री प्रदीप अग्रवाल, कार्योपाध्यक्ष मा. डॉ
संदेश गुजराथी,संचालक मा.सी.ए. नीरज अग्रवाल, मा. जितेंद्र जैन, मा. हरी भिका वाणी ,मा. डॉ. बी एस पाटील, संस्थेचे चिटणीस डॉ. मा. प्राचार्य डॉ. ज्योती राणे ,गरुड महाविद्यालय शेंदुर्णी येथील उपप्राचार्य डॉ. शाम साळुंखे, महाविद्यालयीन प्राध्यापक प्रतिनिधी प्रा.पी आर भुतडा, शिक्षक प्रतिनिधी मा श्री डी व्ही महाले, तसेच महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य,मा. विभागप्रमुख, सर्व समित्यांचे प्रमुख व सदस्य,प्राध्यापक प्राध्यापकेतर बंधू-भगिनी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.विजय तुंटे, कल्पना पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. पी टी चौधरी यांनी केले .अधिवेशनाला खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष मा.श्री प्रदीप अग्रवाल,कार्योपाध्यक्ष डॉ संदेश गुजराथी यांच्यासह सर्व खान्देश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी,मा. प्राचार्य डॉ. ज्योती राणे ,समन्वयक प्रा.एस ओ.माळी सर्व उपप्राचार्य, सर्व समिती प्रमुख व सदस्य, विभागप्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी ,वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button