?️अमळनेर कट्टा..ओ दादा तो उच्चा खांब ते टाका पन जराशी जमिनीवर अमयनेर मजारली घान बी देखा.. व्हॉट इज थिस..?डुकरे..!साचेल पानी..
!अमळनेर येथे नुकतेच 105 फूट उंच खांब टाकून अमळनेर नगरपरिषदेचे दत्तक नगराध्यक्ष साहेबराव पाटील यांनी नवीन विक्रम केला.अर्थात विक्रम करण्यात त्यांचा हात कोणी धरणार पण नाही.म्हणजे कसं हे मॅडम नगराध्यक्षा आहेत पण सर्वे सर्वा दादा आहेत.अमळनेर नगरपरिषदेचे सर्व निर्णय राज भवनातून घेतले जातात हे जग जाहीर आहे.हा पण एक विक्रम च आहे की बायको नगराध्यक्षा आणि वर्चस्व नवऱ्याचे..!असो..पण अमळनेर शहरातील घाण दुर्गंधी, डुकरे,तुंबलेल्या गटारी,साचलेले पाणी,शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांएव्हढेच डुकरे जे डबा खातांना विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला मस्त पैकी नरिमन पॉईंट वर फिरायला आल्यासारखे फिरतात..!एक ना दोन ..!
या शहराला स्वछ शहर सुंदर शहर असल्याचा कागदोपत्री पुरस्कार पण मिळाला आहे अर्थात हा ही एक विक्रमच आहे दादांचा..!स्वच्छतेच्या नावाने बोंब असलेल्या अमळनेर नगरपरिषदेचे नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष असून निव्वळ शो बाजी चालली आहे. अनेक कॉलनी परिसरात गटार काढणे झाडू मारणे इ रोजची कामेही होताना दिसून येत नाही. औषध फवारणी,कीटक नाशक फवारणी वै करावयाची असते हे आमच्या अमळनेर नगरपरिषदेला माहीतच नाही..! गटार काढायची आहे तर फोन लावावा लागतो की गटार काढायला 6 महिन्यांपासून कोणी आलं नाही तर माणूस पाठवा..झाडायला कोणी येत नाही हो साहेब कोणाला तरी पाठवा..!दाबून कर वसूल करणारी ही नगरपरिषद नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण न करता उंच खांब मात्र बसवत आहे..खांब उभा केला ..झेंडा ही फडकणार..अभिमानाची गोष्ट आहे पण जर याबरोबरच दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा पुरविण्याकडे लक्ष दिले तर बरं होईल अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.






