Amalner

तरुणाईचा अभिनव उपक्रम – अमळनेर रिडर्स असोसिएशन !

तरुणाईचा अभिनव उपक्रम – अमळनेर रिडर्स असोसिएशन !

अमळनेर येथे – पुस्तकं वाचनाची आवड असणाऱ्या युवावर्गाने एकत्र येत वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे . ‛ अमळनेर रिडर्स असोसिएशन ’ ही हौशी वाचकांची संघटना गेल्या सहा महिन्यांपासून वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी वाचनकट्ट्यासारखे विविध उपक्रम राबवित आहे . आठवड्यातुन एक दिवस उदयकुमार खैरनार यांच्या निवासस्थानी दर रविवारी सायं. 4 वाजता – पटवारी कॉलनी परिसरात सर्व वयोगटातील वाचनप्रेमींनी एकत्र येत आहेत . वाचनात आलेल्या पुस्तकांवर तासभर चर्चा करणे , इतरांना वाचनासाठी प्रेरित करणे , अश्या या सर्जनशील उपक्रमात , ‛ मी काय वाचतो , काय वाचावं ’ या विषयावर चर्चा घडवली जाते आहे . सोबतीला तज्ञ पाहुण्यांना आमंत्रित करून संवादसत्र होत आहेत . साहित्याचा अन समाजाचा अनुबंध घट्ट करू पाहणाऱ्या या सर्जनशील उपक्रमाचे संचालन व्हाट्सऍपग्रुपच्या माध्यमातून होत आहे .
या उपक्रमाचे आयोजन निखिल बैसाणे , मेघागौरी घोडके , उदयकुमार खैरनार , युवावक्ते सारांश सोनार , स्वप्नील चव्हाण , सोनिया भावसार , ज्योती वानखेडे , भोजराज पाटील , गुंजन क्षीरसागर , विवेक अहिरे , पूजा सुरसुरे, प्रा. कृष्णा संदानशिव , सुवर्णा देसले , योगेश संदानशिव- इत्यादींनी केले आहे.आजच्या गतिमान जीवनात वाचन संस्कृती जोपासणारा एक अनोखा उपक्रम म्हणून अनेक क्षेत्रातील जाणकारांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे . या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी निखिल बैसाने 8983962044 , उदयकुमार खैरनार 7083887603 , सारांश सोनार 9075490480 यांच्याशी संपर्क साधावा , असे आवाहन आयोजकांनी केले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button