Amalner

Amalner: प्रताप महाविद्यालयात एन एस एस आणि जिल्हा क्षयरोग केंद्र तर्फे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम संपन्न..

Amalner: प्रताप महाविद्यालयात एन एस एस आणि जिल्हा क्षयरोग केंद्र तर्फे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम संपन्न..

अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात जिल्हा क्षयरोग केंद्र जळगांव व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. बी. जैन हे होते. प्रमुख अतिथी म्हणून वरीष्ठ उपचार पर्यवेक्षक निलेश पवार उपस्थित होते. कार्यक्रमाला मार्गदर्शनपर वचनात गणेश कुंवर यांनी क्षयरोगाची लक्षणे, उपचार व क्षयरोग शोधमोहीम २०२३ याचे कार्ये स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ ए बी जैन सर यांनी क्षयरोगाला शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाने उपचार होऊ शकतो व क्षयरोगीने घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले.

राष्ट्रिय सेवा योजनेत दोन वर्ष पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्राचार्य ए. बी. जैन यांच्यातर्फे वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. अवित पाटील यांनी केले तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला महिला कार्यक्रम अधिकारी भाग्यश्री जाधव, संदीप अहिरराव, राजेंद्र चंद्रात्रे, रमाकांत सैंदाणे उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वयंसेवक अमोल पाटिल, जगदीश पाटील इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button