Pune

ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर पडून तरुणाचा जागीच मृत्यू

ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर पडून तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

इंदापूर तालुक्यातील शहा ग्रामपंचायत रस्ता रुंदीकरणाचे काम जेसीबी आणि ट्रॅक्टर च्या सहाय्याने चालू होते. नदीच्या कडेला असलेला मुरूम ट्रॅक्‍टरच्या साह्याने रस्ता रुंदीकरणासाठी वापरला जात होता. हे काम दिवसभर चालू होते मात्र संध्याकाळी पाचच्या सुमारास युवक धनाजी जामदार आपल्या ट्रॅक्‍टरच्या साह्याने मुरुम रस्त्यावरती टाकण्याचे काम करत होता. त्या ठिकाणी दुसरा ट्रॅक्टर मुरमाची खेप खाली करण्यासाठी आला असता धनाजी त्यास मदत करत होता मात्र अचानक टाली धनाजीच्या अंगावरती पडली त्यात धनाजीचा जागीच मृत्यू झाला. या अचानक त्यांच्या जाण्याने पूर्ण सरडेवाडी आणि शहा गावात शोककळा पसरली आहे. नेहमी दुसर्‍याच्या सुख-दुःखात आणि मदतीला धावणारा धनाजी आज अचानक गेल्याने तरूण वर्गात शोककळा पसरली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button