?️ अमळनेरची पुन्हा रेड झोन कडे वाटचाल…तीन रुग्ण पॉझिटिव्ह
अमळनेर येथे गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली होती. पण आज पुन्हा 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सदर तिन्ही रुग्ण जळगांव येथील रुग्णालयात दाखल असून दोन महिला मुठ्ठे गल्ली आणि कासार गल्ली तर एक पुरुष पाटील वाडा असे हे रुग्ण वृद्ध आहेत .
तसेच अजून 2 रुग्णांचे अहवाल धुळे येथून येण्याचे बाकी आहे. सध्या कोव्हीड केअर सेंटर येथे 14 रुग्ण संशयित असून त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. कोव्हीड केअर सेंटरला सध्या तरी एकही रुग्ण कोरोना बाधित नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ ताळे यांनी दिली आहे.






