Maharashtra

मानवतेसाठी एक होऊ… चिमुकलिंना न्याय मिळवून देवू !

मानवतेसाठी एक होऊ… चिमुकलिंना न्याय मिळवून देवू !

मानवतेसाठी एक होऊ... चिमुकलिंना न्याय मिळवून देवू !

चोपडा :प्रतिनिधी सचिन जयस्वाल
आज सकाळची पहाट आम्ही मोठ्या तेजोमय चेहऱ्याने,निधड्या छातीने, गर्वाने आमच्या राष्ट्रध्वजाला सामोरे जावू तिरंग्याला सलामी देवू कारण आज आम्हा साऱ्या भारतियांसाठी आजचा स्वातंत्रदिन म्हणजे जीव की प्राण…यासोबतच हिंदु धर्मियांसाठी आजच 15 ऑगस्ट रोजी रक्षा बंधन म्हणजे भावाने बहिणी कडून पवित्र राखी बांधून तिच्या रक्षणाची, सुरक्षेची जबाबदारी या बंधनाद्वारे उचलायची असते असाच हा सण …आज स्वातंत्रदिन असला तरी आम्ही विचाराने..आचाराने..किती स्वातंत्र झालो आहोत याची प्रचिती आस-पास घडणाऱ्या घटना दर्शवतात .काल  चोपडा तालुक्यातील वैजापूर गावात दोन आदिवासी चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारातून ज्याच्या मेंदुला झिनझीन्या आल्या नसतील तो माणूस नसावा ,त्या  चिमुकल्या आदिवासी असतील म्हणून काय झाले?शेवटी आहेत तर रक्ता-मासाचे बाळ .या आज रक्षा बंधनाच्या पवित्र दिनी मानवतेसाठी एकत्र येवू पीड़ित निरागस मुलींसाठी जात, धर्म,पंथ,पक्ष,या साऱ्यांचा त्याग करुन फक्त मानवता या एका छताखाली येवून अबाल..अचेतन..चिमुकल्या मुलींना न्याय मिळवून देवू आपण आलात तर हीच खरी रक्षा बंधना निमित्त भावाकडून बहिणीला रक्षणाची ओवाळणी असेल .सर्व समाज एकत्र जनआक्रोश मूक मोर्चा दिनांक 16 रोजी सकाळी 10 वाजता येथील शासकीय विश्रामगृह येथून सुरु होऊन तहसील कार्यालय येथे पोलिस प्रशासन व तहसीलदार यांना निवेदन देवून मूक मोर्चा समाप्त केला जाईल कृपया सर्व धर्मीय,पालक,शिक्षक,व्यापारी,राजकीय ,विद्यार्थी,विद्यार्थिनी,महिला भगिनी,बंधु आपण सर्वांनी मोर्चात सामील होऊन आपापल्या संवेदना जीवंत ठेवाव्यात ही विनंती .यासाठी कुठल्याही फोनची अथवा कोणाच्याही निरोपाची वाट बघू नये
             सर्व सुज्ञ नागरिक
         चोपडा शहर व तालूका

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button