राधानगरी तालुक्यातील केळोशी बु व कानेकरवाडी पैकी मोहीतेवाडी, ग्रामस्थांचा जीवन पाटील यांना पाठिंबा
सुभाष भोसले-कोल्हापूर
राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार -जीवनदादा पाटील यांच्या राशिवडे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रचार दौऱ्यादरम्यान राधानगरी तालुक्यातील केळोशी बु, तसेच कानेकरवाडी पैंकी मोहीतेवाडी या गावांमध्ये आबिटकर गटाला खिंडार पाडत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार -जीवनदादा पाटील यांना सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. व जीवन पाटील यांना विधानसभेला ताकद देवु असे जाहीर केले. यावेळी येथील ग्रामस्थांनी आपल्या समस्यांचे पाढाच वाचला व आपल्या समस्या जीवन पाटील यांच्या समोर मांडल्या.व तेथील समस्या आपण सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत व सोडविण्यासाठी प्रयत्नशिल राहु असे जीवन पाटील यांनी सांगितले. यावेळी कानेकरवाडी पैंकी मोहीतेवाडी येथे चंद्रकांत मोहीते,अनिल मोहीते, सुभाष पाटील, संभाजी मोहीते,शिवाजी मोहीते, निवास मोहीते, प्रकाश पाटील, युवराज पाटील, मधुकर पाटील, दिपक मोहीते, युवराज मोहीते, उदय मोहीते, सागर मोहीते, दिपक मोहीते आदि तर केळोशी बु येथे लक्ष्मण कांबळे, जयाजी कांबळे, भिकाजी कांबळे, अनिल कांबळे, अक्षय कांबळे, नमाजी कांबळे, धनाजी कांबळे, अशोक कांबळे आदिसह संपूर्ण दोन गावातील ग्रामस्थांनी जीवन पाटील यांना पाठींबा दिला.






