शिरूड ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गावात अस्वच्छतेचा कळस…
Amalner :- तालुक्यातील शिरूड ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळ जीपणा मुळे गावात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. गटारे स्वच्छ
करण्यात आले नाही नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण
झाला आहे, इतकेच नव्हे तर बहिरम पार समोरील असलेल्या पाळ विहार जवळ घाणीचे साम्राज्य असल्याने ने मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे या बाबत समोर असलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच गावातील गटारी वेळो वेळी साफ करत नाही, याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
गटारी मध्ये काडी,केरकचरा गेल्याने गटारी
घाणीने तुंबून भरल्या आहेत. गटाराचे पाणी तुंबल्याने गावात
डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गटारीत पाणी साचल्याने दुर्गंधी
येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच गावात वेळो वेळी धूर फवारणी केली जात नाही या बाबत गावात नागरिकांचा आरोग्यविषयी मोठी समस्या उभी आहे या कडे तातळीने लक्ष देण्याची गरज आहे.






