Pune

आदिवासी क्रांती संघटना,असाणे मार्फत पोलीस भरतीच्या सराव लेखी परीक्षा उत्साहात

आदिवासी क्रांती संघटना,असाणे मार्फत पोलीस भरतीच्या सराव लेखी परीक्षा उत्साहात दिलीप आंबवणे पुणे पुणे : आदिवासी क्रांती संघटना,असाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस भरती सराव परीक्षा पार पडली. या मध्ये अनेक ठिकाणाहून आलेल्या विद्यार्थ्यांचा या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ह्या स्पर्धेमागील महत्व म्हणजे आपल्या युवक युवतींचा पोलीस भरती बद्दल असणारी उत्सुकता सराव परिक्षेमधून दिसून आली. परीक्षेसाठी आपण दोन केंद्र निवडली गेली होती तळेघर आणि असाणे या दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यां 86 संख्या इतकी उपस्थिती दर्शवली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या विद्यार्थ्यांची काळजी म्हणून मास्क व सँनिटायझेर चा वापर करण्यात आला. त्याचं बरोबर आदिवासी क्रांती संघटनेने असाणे केंद्रावरील विध्यार्थ्यासाठी वेळेच भान ठेऊन त्यांच्या नाश्त्याची पण सोय केली होती. कोणताही हलगर्जीपणा न करता पोलीस भरतीच्या धर्तीवर राबविलेली सराव लेखी परीक्षा योग्य पध्द्तीने पार पडली.
सदरील सराव लेखी परीक्षेचे नियोजन हे आदिवासी क्रांती संघटना, असाणे या मुख्य कमिटीतील सदस्य सुरेश सुपे,सागर गभाले,पेवजी मोहरे,दत्तात्रय गभाले,दत्तात्रय ढवळे,सागर ठुबल,नारायण गवारी,गणेश गभाले,सचिन दगडे,राजेंद्र गभाले,रविंद्र गभाले,समीर गभाले,प्रशांत गभाले,रामदास ढवळे,दशरथ भांगले,सचिन बांबळे,अमोल ठुबल,राजाराम आंबवणे, किसन मोरे,अमोल ढवळे या सर्वांनी सदरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button