Pandharpur

मा विजयसिंह मोहिते पाटील यांचे पालखी मार्गासाठी राहिले मोलाचे योगदान

मा विजयसिंह मोहिते पाटील यांचे पालखी मार्गासाठी राहिले मोलाचे योगदान

प्रतिनिधी
रफिक आतार

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी मोलाचे योगदान राहिले आहे आज या पालखी मार्गाचा उद्घाटन सोहळा होत असताना विजयदादांच्या योगदानाची चर्चा राज्यात रंगताना दिसत आहे.दळणवळण सुविधेवर राज्याची अर्थात देशाची प्रगती अवलंबून असते.यासाठी नेतृत्व करत असताना विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दळणवळण सुविधेला आपल्या कारकिर्दीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिलेले दिसते. बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून काम करत असताना अनेक ऐतिहासिक रस्त्यांची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली.त्यामुळे राज्याच्या प्रगतीला वाव मिळाला. लाखो वैष्णव आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर चालत असा प्रवास पायी चालत करीत पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला जात असतात. संतश्रेष्ठ माऊलीच्या व तुकाराम महाराजांच्या पालखी बरोबर पायी चालत जाण्याची ही परंपरा फार जुनी आहे. ऊन वारा पावसाची तमा न बाळगता लाखो वैष्णव पंढरीच्या पांडुरंगाला जातात. हा पायी प्रवास करत असताना ओबडधोबड रस्ते असल्याने वारकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. दिवसेंदिवस पालखीसोबत जाणाऱ्या वारकरी बांधवांची संख्या वाढत असताना रस्त्यांचे नूतनीकरण करणे,रुंदी वाढविणे गरजेचे बनले होते. अनेकवेळा या रस्त्याने जाताना येताना विजयदादांच्या मनात हे रस्ते भव्य दिव्य करण्याचे दृढ विचार मनात यायचे.म्हणून त्यांनी प्राधान्याने बांधकाम मंत्री असताना या पालखी मार्गांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. हे पालखी मार्ग तीन पदरी निर्माण केली त्यामुळे वारकरी बांधवांचा मार्ग सुकर होत गेला आज या मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाले आहेत. यामुळे दळणवळण सुविधेला तर गती मिळणारच आहे पण महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या पालखी सोहळ्यातील लाखो वैष्णवांना सोईस्कर रित्या आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाता येणार आहे. म्हणूनच व्यापक आणि भव्य दिव्य पालखी मार्ग असावेत या संकल्पनेला सुदृढ बनविणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे योगदान मोलाचे आणि अनन्यसाधारण आहे. बांधकाम मंत्री पदानंतर सुद्धा त्यांनी वेळोवेळी रस्त्यांचा पाठपुरावा केला त्यामुळे त्यांच्या योगदानाची चर्चा आजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राज्यात सुरू असताना दिसत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button