kannad

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची शनि देवस्थान सदिच्छा भेट

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची शनि देवस्थान सदिच्छा भेट

कन्नड उदय वायकोळे

विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर हे आज कन्नड तालुक्यातील चिंचोली लि. व करंजखेड मंडळात ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर असताना शनेश्वर देवास्थान वाकी नेवपूरचे मठाधिपती श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शनिभक्त संत सुखदेव महाराज यांची देवस्थानवर सदिच्छा भेट घेऊन दर्शन घेतले शनेश्वर देवस्थानच्या वतीने महाराजांनी शाल श्रीफळ फेटा देऊन त्यांचे स्वागत केले
या वेळी महाराजांचे भक्त राज्यसभा खासदार भागवत कराड साहेब ,माजी उपमहापौर विजयजी औताडे पाटील(भाजपा जि. अध्यक्ष ), जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मा. आ. नितीन पाटील, भाजपा सोशल मीडिया जि.उपप्रमुख प्रदीप बोडखे, भगवान कोल्हे, संजयजी खंबायते, पं.स.सदस्य सुभाष बावस्कर, कल्याण पाटील ,योगेश पवार , बहुसंख्य शेतकरी व नागरिक यावेळी उपस्थीत होते.

Leave a Reply

Back to top button