लोणंद रेल्वे स्थानक जंक्शन म्हणून ओळख असली याठिकाणी सर्व लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट रेल्वे थांबत नाहीत प्रवासी वर्ग नाराज
दिलीप वाघमारे
लोणंद दिनांक 27 प्रतिनिधी लोणंद शहरातील रेल्वे टेशन जंक्शन म्हणून ओळख आहे परंतु लांब पल्ल्याच्या रेल्वे थांबत नसल्याने रेल्वे स्टेशन शोपीस बनले आहे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दखल घेऊन लांब पल्ल्याच्या रेल्वे थांबवाव्यात त्याचबरोबर नुकतेच लोणंद फलटण पॅसेंजर शुभारंभ काही महिन्यापूर्वी झाला आणि रेल्वस्थानक गजबजू लागले परंतु या स्थानकात सुलभ स्वच्छालय फक्त नावापुरते रात्रीच्या वेळी कुलपे लावले असतात कॅन्टींग व्यवस्था पेपर स्टॉल आणि स्थानकात प्रत्येकी रेल्वे थांबू लागली तर जंक्शन म्हणून नावाप्रमाणे ओळख होईल नाहीतर असून अडचण नसून खोळंबा अशी दयनीय अवस्था आहे शहरात चार जिल्ह्यातील संपर्क प्रवासी वर्गांचे दळणवळण म्हणून ये जा करीत असतात लोणंद रेल्वे स्थानक शालेय विद्यार्थी कामगारवर्ग केंद्र शासन राज्य शासनाचे कर्मचारी एमायडिसी मार्केट कमिटी मधील ऑफिसर लोकांना ये-जा करण्यासाठी सुलभ ठिकाण म्हणून त्यांची गणना चहूकडे आहे.

सध्याचे माढा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार श्री रणजित नाईक निंबाळकर यांनी लक्ष घालून या ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या सर्व रेल्वे थांबणे नितांत गरज आहे आणि यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडे विविध पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे पाठपुरावा करीत आहेत याचा विचारही केंद्रीय रेल्वे मंत्री आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे






