Ausa

औसा च्या हरेगावात ४६४५४ रुपये ची अवैध दारू जप्त किल्लारी पोलिसाची दमदार कार्यवाही 46454 रुपायची अवैध दारू जप्त

औशा च्या हरेगावात ४६४५४ रुपये ची अवैध दारू जप्त
किल्लारी पोलिसाची दमदार कार्यवाही 46454 रुपायची अवैध दारू जप्त

प्रतिनिधी प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे

औसा तालुक्यातील औसा – सास्तुर रोडवर हरेगाव येथील स्वराज धाब्यावर दिनांक ९ एप्रिल ते १० एप्रिल मध्यरात्री किल्लारी पोलीस स्टेशनच्या पथकाने अचानक धाड टाकून ४६४५४ रूपयांचा देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करून दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची अधिक माहिती अशी की जवळगा पो. ते हारेगाव रोडवर हरेगाव शिवारात स्वराज नावाचा प्रवीण कोव्हाळे याचा एक ढाबा आहे. तसा हा नावालाच ढाबा होता. गेल्या अनेक वर्षंपासून या धाब्यावर बिन भोबाट देशी विदेशी दारूची विक्री सुरू होती. यामुळे जवळगा, हरेगाव, लिंबाळा येथील अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. या पूर्वी ही या धाब्यावर पोलिसांनी धाडी टाकल्या होत्या पण येथील दारू विक्री काही बंद झाली नाही
. सध्या संपूर्ण जगात देशात कोरोना साथीमुळे लॉक डाऊन सुरू असताना येथे खुलेआम अवैध दारू विक्री सुरू होती. याची गंभीर दखल घेत किल्लारी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार, पोहे कॉन्स्टेबल गणेश यादव, गोविंद राठोड, डॉ. बी. कांबळे, बन, यांनी काल रात्री अचानक धाड टाकून ४६४५४ रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करून ढाबा मालक प्रवीण कोव्हाळे याच्यावर गु. र. नं. ६९/२०२० कलम ६५ अ, इ, म. प्रो. अँक ट १८३, २६९, भा. द. वी ५१ ब, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कलम २,३,४ व साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रवीण कोव्हाळे फरार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button