अमळनेर येथे श्री गणेश भक्तांच्पा गर्दीने “सोशियल डीस्टनिंग”चा फज्जा..प्रशासन ढिम्म…एक जबाबदार व्यक्ती नुसार आजच्या दिवस सूट दिली आहे…
अमळनेर:राज्य आणि जिल्हा प्रशासनाने कोव्हिड 19 च्या वाढत्या प्रभावाच्या धर्तीवर नागरीकांना सोशल डीस्टनिंग चे आवाहन केले आणि त्यानुसार नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. परंतु आज गणेश चतुर्थी च्या दिवशी वेगळेच चित्र पहावयास असले तरी श्री गणेश भक्तांची बाजारात होणार्या गर्दिनै मात्र सोशियल डीस्टनिंग चा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे पोलीस प्रशासन वगळता आज या गर्दीच्या ठिकाणी प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित नव्हते.नगरपरिषद आणि महसूल प्रशासनाचे कोणतेही प्रतिनिधी या अत्यन्त गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण करण्यासाठी उपस्थित नव्हते.
त्यातल्या त्यात अजून विशेष बाब म्हणजे एका जबाबदार शासकीय कर्मचारी च्या सांगण्यानुसार आजचा दिवस सूट द्यायला तोंडी स्वरूपात सांगण्यात आले आहे…
नेहमी छोट्या मोठ्या दुकांदारांवर कार्यवाही करणारे पावती फाडणारे नगरपरिषद कर्मचारी आज ढिम्म पणे उभे होते.प्रत्येक दुकानात नियमांचे उल्लंघन होत होते..सोशल डिस्टनगसिंग नव्हते…मास्क चा उपयोग नव्हते…सॅनिटायझर चा उपयोग नव्हता….एकाच दुकानात अनेक लोक होते ….4 ते 5 पेक्षा अधिक व्यक्ती गणेश मूर्ती घेण्यास आलेले होते…एक ना अनेक संचारबंदी च्या आणि इतर आपत्ती व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन आज अमळनेर शहरात करण्यात आले आणि ढिम्म प्रशासन पाहत राहिले...
अमळनेर तालुक्यात सध्या दिवसेंदीवस कोरोनाचे रूग्ण वाढत असून प्रशासनाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार नियमांचे पालन होणे आवश्यक होते आणि कार्यवाही होणे देखील गरजेचे आहे.






