Amalner

?️ अमळनेर कट्टा..बँक आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दोघांवर गुन्हा दाखल….

?️ अमळनेर कट्टा..बँक आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दोघांवर गुन्हा दाखल….

अमळनेर येथील युनियन बँकेतील शिपाई सागर पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले तसेच मानसिक छळ केला म्हणून निम्न तापी प्रकल्पाचा चालक तसेच अमळनेर येथील तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबतीत सविस्तर माहिती अशी की सागर पाटील या युनियन बँकेतील शिपायाने ५ जून रोजी त्याच्या राहत्या घरी पंख्याला नायलॉन दोरी बांधून गळफास घेऊन
आत्महत्या केली होती. याआधी सकाळी सागरने त्याच्या वडिलांना एकनाथ पंढरीनाथ पाटील यांना नायगाव येथे येत आहे असा फोन केला होता. मात्र सुमारे साडे बारा वाजेच्या सुमारास तो बँकेत आला नाही म्हणून मॅनेजर शुक्ला यांनी
चौकशी केल्यावर सागरने आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली होती.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे यांनी भेट दिल्यावर त्यांना सागरने आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहिल्याचे आढळून आले. या चिठ्ठीत स्वप्नील शिंदे उर्फ सैंदाने रा.अमळनेर व संतोष साहेबराव पोरजे रा. त्र्यंबकेश्वर नाशिक हल्ली मुक्काम निम्न तापी प्रकल्प हे दोघे मानसिक छळ करीत असल्याचे नमूद केले आहे. स्वप्नील पाटबंधारे खात्यात आहे तो गाडी चालवतो. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा. माझ्या घरच्यांचा काही एक संबंध नाही. त्यांना सोडू नका, असे चिठ्ठीत लिहिले होते.

सागरच्या आत्महत्येनंतर त्याची मोटरसायकल स्वामी समर्थ मंदिराजवळ बेवारस
स्थितीत आढळून आली होती. नागरिकांच्या तक्रारीवरून ती पोलिसांनी जप्त केली
त्यावरून एकनाथ पाटील यांनी २२ रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद
दिल्यावरून स्वप्नील शिंदे व संतोष पोरजे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा
गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.
दोन्ही आरोपी फरार झालेले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button