?️ जिवंतपणीच नाही तर मेल्यावरही तुकडेच खाली पडतात…सुस्त अमळनेर नगरपरिषद
अमळनेर नगरपरिषदेने तुटलेल्या स्मशानभूमीतील दाहिनी प्रेताची होत आहे विटंबना..नगरपरिषदेचे दुर्लक्ष
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर
येथे ताडेपुरा भागात अमरधाम अस्तित्वात आहे. या अमरधाम मध्ये मृत व्यक्तींचा अंतिम संस्कार केला जातो. या स्मशानभूमीतील दाहिनी तुटलेल्या अवस्थेत आहे.लोखंडी ब्रॅकेट मध्यभागी तुटलेले असून शव जळत असताना सरळ जळक्या प्रेताचे अवशेष खाली पडतात असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्धे प्रेत अर्धवट तुटलेल्या दाहिनीत जळते तर अर्धे खाली पडून जळत राहते. अनेक वेळा खाली पडलेले प्रेताचे अवशेष अर्धेच जळतात.पूर्ण पणे जळत नाही. त्यामुळे प्रेताची विटंबना होत असून लोकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
भारतीय संस्कृतीत अंतिम संस्कारांना अत्यन्त महत्व आहे.जन्मा पासून मृत्यू पर्यंत 16 संस्कारांपैकी एक शेवटचा महत्व पूर्ण संस्कार अंतिम संस्काराला मानले जाते.अमळनेर शहर संतांचे,पवित्र,धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात मात्र अत्यन्त संस्कारी,भारतीय संस्कृती चे रक्षक आता कुठे गेले? अमळनेर नगरपरिषद प्रशासन असेही अत्यन्त सुस्त आहे लोक प्रतिनिधींनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे.
या अमर धाम मध्ये अनेक जाती धर्माचे लोक अंतिम संस्कारांसाठी आपले जिवलगांचे शव आणतात. त्यांच्या डोळ्यासमोर शवाचा अर्धा भाग जळत असताना खाली पडतो आणि अत्यन्त दुःखात असलेले नातेवाईक काहीच करू शकत नाही.दाहिनीच्या खाली अर्थवट जळलेले अवशेष उघड्या डोळ्यांनी पाहणे फक्त त्यांच्या हाती असते.विकासाच्या मोठं मोठ्या गप्पा मारणारे नगरपरिषद याबाबतीत अजिबात गंभीर नसल्याचे निदर्शनास आले आहे.याबाबतीत ताबडतोब नगरपरिषदेने सदर दाहिनीची दुरुस्ती करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.






