तलाठी व मंडळाधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा अमळनेर तालुका तलाठी संघाने निषेध
नूरखान
अमळनेर (प्रतिनिधी)तलाठी व मंडळाधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा अमळनेर तालुका तलाठी संघाने निषेध केला असून यातील आरोपीना अटक न झाल्यास आपत्ती व्यवस्थापन व नैसर्गिक आपत्ती कामे वगळता लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी सीमा अहिरे आणि तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देण्यात आले.
प्रांताधिकारी सीमा अहिरे आणि तहसीलदार मिलिंद वाघ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवारी १६ रोजी दुपारी अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील शाळेच्या मागील गावतलावा वरून होणारी अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या तलाठी, मंडलधिकारी यांच्या वाहनांवर ट्रॅक्टर
चढवून सोनू पारधी याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि वाहनाचे नुकसान केले. या घटनेचा तलाठी संघटनेने निषेध करून आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही तलाठी यांच्या वर हल्ले झाले आहेत. त्यामुळे शासकीय वाहन मिळावे आणि पोलीस बंदोबस्त मिळावा.
गौण खनिज कार्यवाहीसाठी दिलेल्या
नियमांप्रमाणे सुविधा मिळाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करुन आरोपीस अटक न
झाल्यास लेखणी बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनावर तालुकाध्यक्ष गणेश महाजन जिल्हा
उपाध्यक्ष योगेश पवार , उपाध्यक्ष वाल्मिक पाटील चिटणीस मुकेश देसले, एस. बी. बोरसे , आर. टी. दाभाडे , पराग पाटील , स्वप्नील कुलकर्णी , जितेंद्र जोगी ,डी. एस. देशमुख , वाय. आर. पाटील , एस. जी.
पंचभाई , जितेंद्र पाटील , के. एस. चौधरी , प्रदीप कडाळे , जि. जी. पाटील , महेंद्र पाटील , एम. पी. भावसार, प्रकाश महाजन यांच्या सह्या आहेत






