Amalner

विश्व हिंदु परिषद व बजरंग दल शाखेच्या वतीने कारगील विजय दिवस साजरा केला. व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.

विश्व हिंदु परिषद व बजरंग दल शाखेच्या वतीने  कारगील विजय दिवस साजरा केला. व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.

अमळनेर : भारतीय सैन्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही पाकिस्तानवर सन १९९९ मध्ये झालेल्या युद्धात विजय प्राप्त केला. तो दिवस होता २६ जुलै. हा दिवस कारगील विजय दिवस म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. येथील विश्व हिंदु परिषद व बजरंग दल शाखेच्या वतीने नुकताच कारगील विजय दिवस साजरा केला. यानिमित्ताने माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभेदार बळीराम वानखेडे, प्रमुख वक्ते सिनेट सदस्य दिनेश नाईक,विहिंपचे शहराध्यक्ष संजय विसपुते हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख वक्ते दिनेश नाईक यांनी कारगीलच्या युध्दात भारतीय सैनिकांनी प्राणाची बाजी लावून अतुलनीय शौर्य आणि पराक्रम गाजविला. या आधीच्या युध्दातही सैनिकांचे शौर्य असेच प्रेरणादायी होते. केवळ युध्दच नाही तर देशात आलेल्या आपत्तीच्या काळातही सैन्य दलाने महत्वाची भुमिका बजावली आहे. त्यामुळे सैनिकांचा नेहमीच सन्मान केला पाहिजे. काही देशविघातक शक्ती सैनिकांवर हल्ला करतात ही अनुचित व संतापजनक घटना आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. सेवानिवृत्त सैनिक नागराज पाटील यांनी आपल्या मनोगतात कारगील युद्धाची परिस्थिती व तेथील प्रतिकुल वातावरण याची माहिती दिली व सैन्य दल कोणत्याही आक्रमणाचा सामना करण्यास सक्षम आहे सांगितले. तर सुभेदार बळीराम वानखेडे यांनी हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल विश्व हिंदु परिषदेचे आभार मानले. आपल्या सेवाकाळातील आठवणी सांगितल्या. देशहितासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रा.मनोहर बडगुजर,प्रा.जयंत पटवर्धन,प्रा.डी.आर.चौधरी,माजी नगरसेवक विक्रांत पाटील, मेजर राजेंद्र यादव, दिनेश पाटील यांच्यासह १० ते १२ सेवानिवृत्त जवान हजर होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय विसपुते यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. देवेंन्द्र तायडे तर आभार प्रदर्शन आशिष दुसाने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्व हिंदु परिषदेचे अक्षय कासार, राम चौधरी,सचिन चौधरी,पवन बारी,अनिल बडगुजर,शिवकिरण बोरसे आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button