Kurundwad

कुरुंदवाड येथे   हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

कुरुंदवाड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

संदीप आडसूळ

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कुरुंदवाड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कुरुंदवाड शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी भगवे झेंडे लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती.

येथील शिवतीर्थ ठिकाणी नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शहरातून पारंपरिक ढोल ताशा ,हलगी,लेझीम च्या वाद्याच्या गजरात भव्य शोभयात्रा काढण्यात आली यावेळी आला. ‘जय भवानी..जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात येत होत्या. सकाळ पासून मराठा मंडळ, नगरपरिषद, ,क्रांतीजोती मंडळ, परिवर्तन युवा मंच, दयावान तालीम, शिवआज्ञा मंडळ , कुरुंदवाड यांच्यासह शहरात ठिकठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .तसेच येथील एस पी हयस्कुलच्या वतीने सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि येथील शिवतीर्थ च्या वतीने शहरातील अश्वारूढ छ शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सकाळी महाअभिषेक घालण्यात आले.

दुपारी 4 वजता संपूर्ण शहराच्या वतीने व मराठा मंडळ आणि शिवतीर्थ च्या पुढाकाराने संपूर्ण शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली शहरात तिसऱ्या दुसऱ्या वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये संपूर्ण शहरातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला होता तसेच शहरातील सर्व आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध सेवा संस्थेचे पदाधिकारी, विविध तरुण मंडळाचे कार्यकर्ते, मराठा मंडळाचे सभासद, व कार्यकर्ते, या सह बालचमु या भव्य शोभयात्रेत सहभागी झाले होते. भगवे ध्वज लावण्यात आल्याने परिसरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.तर ढोल ताशा आणि हलगी या पारंपारिक वाद्यांने व जय भवानी जय शिवाजी ,जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी परिसर दनदणून गेला होता .यावेळी छत्रपतीच्या जीवनावरील पोवाडे सादरीकरण,या सह आकर्षकपणे सजवलेल्या ट्रॅकटर ट्रॉली छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक मूर्ती. हे शोभायात्रेत मुख्यआकर्षण होते.

Leave a Reply

Back to top button