Pune

लाखो रुपयांचे भेसळयुक्त पनीर केले जप्त ; पोलिस उपायुक्त – बच्चन सिंह यांची कारवाई

लाखो रुपयांचे भेसळयुक्त पनीर केले जप्त ; पोलिस उपायुक्त – बच्चन सिंह यांची कारवाई

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : भेसळयुक्त आणि कमी दर्जाचे पनीर विक्री करणा-या पर्वती परिसरातील एका व्यावसायिकावर गुन्हे शाखेसह अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. त्याच्या दुकानातून दोन लाख 53 हजार रुपये किमतीचे एक हजार 400 किलो पनीर जप्त करण्यात आले आहे.
हरिकृष्ण मुरलीधर शेट्टी असे पनीर विक्रेत्याचे नाव असून पर्वतीतील मित्र मंडळ चौकात विष्णू इमारतीत त्याचे दुकान आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वतीमधील मित्र मंडळ चौकात असलेल्या एका दुकानातून ग्राहकांना भेसळयुक्त पनीर विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने अन्न व औषध प्रशासनाला माहिती देऊन त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी हरिकृष्ण पनीर विक्री करणारा आढळून आला. त्याच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नसल्याचे उघड झाले. त्यानुसार प्रशासनाने अडीच लाख रुपयांचे दीड टन भेसळयुक्त पनीर जप्त केले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार, गणेश साळुंके, सुनील पवार, नीलेश शिवतरे, राकेश खुणवे यांच्या पथकाने केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button