ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्याचे वतीने वयोवृध्द बँक ग्राहकांच्या तक्रारी बाबत प्रबंधक यांना निवेदन…
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयातील राष्ट्रीयकृत व इतर बँकेतून ज्या ज्या वयस्क ग्राहकांना शासनाच्या योजना , श्रावणबाळ योजना , संजय गांधी तसेच दिव्यांगण, इत्यादी ग्राहकांना शासनाच्या वतीने दिले जाणारे मानधन तसेच पेन्शनधारक इत्यादी वयस्क ग्राहकांना आर्थिक व्यवहारा साठी सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात घराबाहेर पडणे म्हणजे अगदी दिव्यच आहे परंतु पैशासाठी जावे लागत असलेने बँकेत लाईन लावा, मास्क बांधणे, नाहीतर उद्या या, मोठ्याने बोलू नका, सही तुमची नव्हे, पुस्तक भरून उद्या मिळेल, पुढील कामे झाले वर बोलवितो लाईनला थाबा, रिशीट भरून आणा, बारकोड नंबर सांगा ? आम्हाला तुमचेच काम आहे का ? असे अनेक कारणे या ग्राहकांना त्रासदायक बोलणे बँक मंडळींचे असते.
आता रिझर्व बैंकने जी आर काढला आहे सिनियर सिटीझनना प्रथम प्राधान्य व नंतर इतर कामे मात्र बैंकातून या उलटच आहे. व (जेष्ठ मंडळीना नाहक त्रास सोसून २-३ हेलपाटे घालावे लागतात यासाठी जिला प्रबंधक मा. राहूल एन्. मानेसो) यांना ग्राहकपंचायत महाराष्ट्र चे जिल्हा अध्यक्ष श्री बी.जे.पाटील तसेच कोल्हापूर महानगरच्या सदस्य व पोलीस मित्र संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्षा सौ. रेणू पोवार सामाजीक कार्यकर्ते अर्जुनराव इत्यादीनी निवेदन देऊन वृद्ध/जेष्ठ ग्राहकांचे तक्रारी बद्दल व त्यावर त्वरीत सर्व बँकाना कळविणेत येईल व त्यामध्ये ग्राहकांना निश्चित न्याय देऊ अशी जिल्हा प्रबंधकांनी ग्वाही दिली..






