Nashik

कापूस खरेदीबाबत केंद्र सरकारच्या उदासीनतेबाबत शेतकरी नाराज

कापूस खरेदीबाबत केंद्र सरकारच्या उदासीनतेबाबत शेतकरी नाराज

शेतकरी संघटना आक्रमक.. ठिकठिकाणी कापूस जाळून केला निषेध

शांताराम दुनबळे

नाशिक -कापूस खरेदीबाबत केंद्र सरकारची उदासीनता असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे . यामुळे संघटनेचे नेते अनिल घनवट यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन पेटले आहे येवला तालुक्यात या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहेत . तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर कापूस जाळून निषेध नोंदवला आहे . तालुक्यातील धुळगावा येथे संघटनेचे कार्यकर्ते विठ्ठल वाळके व बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात कापूस जाळून निषेध आंदोलन करण्यात आले निषेधम्हणून शेतकरी संघटने मार्फत अंगणातच मुठभर कापूस जाळा या पद्धतीचे आंदोलन राज्यभर चालू आहे .येवल्यात देखील कापूस कांदा मका खरेदीबाबत मोठा संभ्रम आहे या सर्व पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला हा निषेध सरकारच्या फसवेगिरीचाही आहे .

शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगाची गाजर दाखवून सत्ता मिळवली + ५० % हमीभाव देण्याच्या गप्पा करतात मात्र संपुर्ण शेतमाल खरेदी करतच नसतील तर हमीभाव कुचकामी ठरतो तसेच तालुक्यात मक्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे परंतु हीच मका खरेदी करताना खरीप व रब्बी अशा अटी लावून मका खरेदी केली जाणार असल्यामुळे या गोष्टीचा देखील निषेध नोंदविण्यात आला . या शेतकरी विरोधी सरकारचा निषेध म्हणून तालुक्यात ठीक ठिकाणी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी मुठभर कापूस जाळून निषेध नोंदवला.येवलातालुका शेतकरी संघटनेचा आक्रमक आंदोलनाचा बालेकिल्ला आहे . या तालुक्यामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांचे मोठ मोठे आंदोलन मागील काळात झाले आहे . यामुळे तालुक्यातील शेतकरी आंदोलनामुळे थेट राज्याच्या विधानसभेत पडसाद उमटत असतात आता पुन्हा या काळात जर सरकारने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन उभे राहील असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे . यामुळे भविष्यकाळात या आंदोलनाची दखल घेऊन सरकार आपली दिशा बदलणार की शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार हे बघणेआता महत्त्वाचं असणार आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button