Amalner

Amalner: पाईप लाईन तुटली.. न प कर्मचाऱ्यांचे युद्ध पातळीवर काम…

Amalner: पाईप लाईन तुटली.. न प कर्मचाऱ्यांचे युद्ध पातळीवर काम…

अमळनेर जळोद येथील नदी काठावरील टेकडीची माती अति पावसाने
ढासळल्याने शहराचा पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन तुटली त्यामुळे पाणी पुरवाठयाचा प्रश्न उद्दभवणार आहे हे लक्षात येताचनपालिकेच्या
कामगारांनी युद्ध पातळीवर काम करत ती जोडली. त्यामुळे फक्त एक दिवसाच्या विलंबाने पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे, अशी माहिती नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने दिली.
जळोद येथील तापी नदी काठावरील अमळनेर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेची यंत्रणा टेकडीवरील माती पावसामुळे ढासळल्याने ५०० मिमी व्यासाची पाईप लाईन तुटली होती. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला. सर्वत्र चिखल झाला होता. पाईप लाईन जोडण्यासाठी संपूर्ण पाईपलाईन रिकामी करण्यात आली.
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. पाणीपुरवठा अभियंता निलेश बैसाणे, विजय विसावे, कमरोद्दीन शेख यांच्यासह कामगारांनी रात्री दहा पर्यंत सतत काम करून पाईपलाईन जोडली.
नदी काठावरील माती भुसभूशीत असल्याने तेथे जास्त काम करता येत नाही. त्यामुळे तेथे संरक्षक भिंत बांधावी लागणार आहे. पाईपलाईन दुरुस्त केल्यानन्तर ती भरण्यासाठी तीन तास लागले. त्यामुळे एक दिवस उशिराने पाणीपुरवठा झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button