?️ अमळनेर कट्टा… प्रोटान शिक्षक संघटना अमळनेर तालुका अध्यक्ष पदी डी ए सोनवणे तर उपाध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम माळी यांची निवड
अमळनेर : येथील प्रोटान (प्रोफेसर,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघ) या संघटनेच्या अमळनेर तालुका अध्यक्ष पदी डी ए सोनवणे व उपाध्यक्ष पदी पुरुषोत्तम माळी यांची निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, आरएमबीकेएस या ट्रेड युनियन अंतर्गत येणाऱ्या प्रोटान या शिक्षक संघटनेची अमळनेर येथे जिल्हा सचिव मिलिंद निकम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक डी ए सोनवणे यांची संघटनेच्या तालुका अध्यक्ष तर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक पुरुषोत्तम माळी यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी राज्य सदस्य सुमित्र अहिरे,जिल्हाध्यक्ष प्रकाश इंगळे, जिल्हासमीक्षा प्रभारी किशोर नरवाडे,धरणगाव गट शिक्षण अधिकारी अशोक बिऱ्हाड़े,राष्ट्रीय किसान मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत जगदाळे, विभागीय हिरामण पाटील, जिल्हाध्यक्ष विश्वास पाटील, रमेश बोढरे,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे तालुका अध्यक्ष नावेद शेख, विद्यार्थी मोर्चा चे नूर पठाण, योगेश पाटील, गुलाब बिऱ्हाड़े,दीपक बिऱ्हाड़े आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा जितेश संदाणशिव, प्रा भानुदास गुलाले, सोपान भवरे, अजय भामरे, दत्तात्रय सोनवणे, प्रा स्वप्निल पवार, अजय पाटीलL, प्रा बापू संदांनशीव,मुनाफ तडवी, सुनील वाघ, सतीश कागणे, निरंजन पेंढारकर, फयाज शेख,अत्ताउल्ल सर, काजी सर, योगेश पाने,शैलेंद्र साळुंके, जितेंद्र पाटील, विलास पाटील, किरण मोहिते, जीतेंद्र बिऱ्हाड़े,देविदास घोडेस्वार यांनी परिश्रम घेतले.






