Bollywood

जादू च्या भूमिकेत होते हे अभिनेते..जाणून घ्या जादूच्या मागचा चेहरा

? बॉलिवूड Breaking.. जादू च्या भूमिकेत होते हे अभिनेते..जाणून घ्या कोण होते ते..

मुंबई सिनेमा हा प्रत्येक भारतीयांच्या नसानसात भिनलेला आहे. असाच एक चित्रपट कोई मिल गया ..ह्या चित्रपटात जादूची भूमिका खूप गाजली होती.अगदी हृतिक रोशन आणि प्रिती झिंटा यांच्या पेक्षा अधिक जादू चा जादू बॉक्स ऑफिसवर झाला होता.जेव्हा जेव्हा कोई मिल गया चा विषय निघतो तेव्हा सर्वात जास्त चर्चा होते ती म्हणजे या चित्रपटातील जादू या पात्राची. जादू या पत्राने केवळ लहान मुलांनाच नव्हे तर सर्वच वयोगटातील सिनेरसिकांना आपल्या प्रेमात पाडले होते. जादू या पात्राविषयी लोकांच्या मनात आजही प्रेम कायम आहे. पण जादूची भूमिका या सिनेमात कोणी साकारली आहे.हे बऱ्याच लोकांना माहीत नाही.

2003 झाली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात जादूची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे इंद्रवदन पुरोहित. मात्र एक दुःखाची गोष्ट म्हणजे इंद्रवदन आज हयात नाहीत. 28 डिसेंबर 2014 रोजी त्यांचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर त्यांच्या या भूमिकेबद्दल सर्वांना माहिती झाली. त्यांनी साकारलेल्या जादू या भूमिकेचा कॉस्ट्यूम ऑस्ट्रेलियात ऑर्डर देऊन बनवण्यात आला होता.याची किंमत एक करोड रुपयांच्या जवळपास होती. चित्रपट पाहताना ही भूमिका अतिशय साधी सोपी वाटत असली, तरी अशाप्रकारची वेशभूषा परिधान करून त्या भूमिकेला न्याय देणे अतिशय आव्हानात्मक असते. आणि हे आव्हान इंद्रवदन यांनी अतिशय लीलया पेलले.
त्यांनी जादूच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला. जादूची भूमिका साकारणारे इंद्रवदन यांनी सब टीव्हीवर येणाऱ्या बालवीर या मालिकेत दिसले आहेत. त्यांनी बालवीर या मालिकेत डुबा डुबा हे पात्र साकारले होते. सब टीव्हीवरील बालवीर ही अतिशय लोकप्रिय मालिका होती. तिचा दुसरा सिझन नुकताच पुन्हा सुरू करण्यात आला आहे. फक्त बॉलीवुडमध्ये नव्हे तर हॉलिवूडमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. हॉलिवूडचा अतिशय प्रसिद्ध चित्रपट ‘लॉर्ड ऑफ द रिंग’ या चित्रपटात सुद्धा त्यांनी भूमिका साकारली आहे.प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या इंद्रवदन पुरोहित यांनी बॉलीवूडमध्ये नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button